Join us

Video - अंधेरीत गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे इमारतीला आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2019 14:27 IST

अंधेरीतील यारी रोडमध्ये इमारतीच्या चौथ्या मजल्याला आग लागल्याची घटना समोर आली आहे.

ठळक मुद्देअंधेरीतील यारी रोडमध्ये इमारतीच्या चौथ्या मजल्याला आग लागल्याची घटना समोर आली आहे. अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगीत दोन जण जखमी झाले आहेत.

मुंबई- अंधेरीतील यारी रोडमध्ये इमारतीच्या चौथ्या मजल्याला आग लागल्याची घटना समोर आली आहे. अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीत दोन जण जखमी झाले असून उपचारासाठी जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, वर्सोवा, यारी रोड गणेश साई मंदिरासमोरील कविता अपार्टमेंटमधील चौथ्या मजल्यावर रविवारी (5 मे) भीषण आग लागली आहे. एसी व गॅस सिलेंडरच्या स्फोट झाल्याने ही आग लागली आहे. या आगीत चौथ्या मजल्याचे मोठे नुकसान झाले आहे. या आगीत दोन जण जखमी झाले असून उपचारासाठी जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. 

 

टॅग्स :आगअंधेरी