Join us

कालिनातील गुजराल हाऊसला आग; जीवितहानी झालेली नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2018 14:49 IST

आगीची तीव्रता जास्त आहे. त्यामुळे आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न  सुरू आहेत. सुदैवाने या आगीत जीवित हानी झाल्याचं कोणतेही वृत्त नाही.सध्या आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न चालू असून सद्यस्थिती कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही.

मुंबई - सांताक्रुज पूर्वेच्या कलिना परिसरातील एका इमारतीला आज सकाळी ११. ५३ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली आहे. गुजराल असं या आग लागलेल्या इमारतीचं नाव आहे. आग लागल्याचे समजताच अग्निशमन दलाच्या ५ गाड्या, ४ पाण्याचे टँकर आणि १ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली आहे. 

आगीची तीव्रता जास्त आहे. त्यामुळे आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न  सुरू आहेत. सुदैवाने या आगीत जीवित हानी झाल्याचं कोणतेही वृत्त नाही. सध्या आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न चालू असून सद्यस्थिती कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही. मात्र, ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप कळू शकले नाही. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवानांचे प्रयत्न सुरु आहेत.

टॅग्स :मुंबईआग