Join us

वरळीतील नेरोलॅक पेंट्सच्या गोडाऊनला लागलेली आग नियंत्रणात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2018 12:06 IST

वरळीतल्या नेरोलॅक पेंटच्या गोडाऊनला लागलेली भीषण आग नियंत्रणात

मुंबई- वरळीतल्या नेरोलॅक पेंट्सच्या गोडाऊनला सोमवारी सकाळी भीषण आग लागली होती. अग्निशामक दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अग्निशामक दलाच्या जवानांच्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. 

नेरोलॅक पेंट्सचं गोडाऊन हे श्रीराम मिलजवळ आहे. दक्षिण मुंबईतला हा गजबजलेला परिसर आहे. विशेष म्हणजे या भागात अनेक कॉर्पोरेट ऑफिसेस आहेत. आगीच्या घटनेमुळे या मार्गावर काही वेळ वाहतूक कोंडीची स्थिती निर्माण झाली होती.

 

टॅग्स :आग