Join us  

मंत्रालयात चौथ्या मजल्यावर शॉर्टसर्किटमुळे लागली आग

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2020 10:12 PM

मुंबई अग्निशमन दल, पोलीस, रुग्ण्वाहिका आणि बेस्टचे कर्मचारी दाखल झाले.

ठळक मुद्देनरिमन पॉइंट येथील मंत्रालयाच्या मुख्य इमारतीमधील चौथ्या माळ्यावर शॉर्ट सर्किट झाल्याची घटना घडली.बेस्टचा वीज पुरवठा करणारा स्टाफ घटनास्थळी तैनात करण्यात आला असून, घटनेवर नियंत्रण मिळविण्यात आले आहे.

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात आगीच्या घटना घडत असतानाच सोमवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास नरिमन पॉइंट येथील मंत्रालयाच्या मुख्य इमारतीमधील चौथ्या माळ्यावर शॉर्ट सर्किट झाल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच येथे मुंबई अग्निशमन दल, पोलीस, रुग्ण्वाहिका आणि बेस्टचे कर्मचारी दाखल झाले.

 मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार, येथे आग लागली नव्हती. थोड्या प्रमाणात  शॉर्ट सर्किट झाले होते. बेस्टचा वीज पुरवठा करणारा स्टाफ घटनास्थळी तैनात करण्यात आला असून, घटनेवर नियंत्रण मिळविण्यात आले आहे.

 

टॅग्स :आगमंत्रालयमुंबईपुणे अग्निशामक दल