मुंबईतील वर्सोवा येथे सिलेंडरच्या गोदामाला आग, प्रचंड स्फोटांनी परिसर हादरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 10:54 IST2021-02-10T10:53:55+5:302021-02-10T10:54:53+5:30

Fire in Versova : मुंबईतील वर्सोवा परिसरात असलेल्या सिलेंडरच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. आगीदरम्यान, गोदामातील सिलेंडरचे स्फोट होत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Fire in Cylinder warehouse at Versova, Mumbai, 4 injured | मुंबईतील वर्सोवा येथे सिलेंडरच्या गोदामाला आग, प्रचंड स्फोटांनी परिसर हादरला

मुंबईतील वर्सोवा येथे सिलेंडरच्या गोदामाला आग, प्रचंड स्फोटांनी परिसर हादरला

मुंबई - मुंबईतील वर्सोवा परिसरात असलेल्या सिलेंडरच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. आगीदरम्यान, गोदामातील सिलेंडरचे स्फोट होत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली आहे. सध्या अग्निशमन दलाची १६ वाहने घटनास्थळी दाखल झाली असून, आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. (Fire in Cylinder warehouse in Mumbai)

मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी पावणे दहाच्या सुमारास वर्सोवामधील .यारी रोड येथे असलेल्या गॅस सिलेंडरच्या गोदामाला आग लागली. अग्निशमन दलाला याची माहिती मिळाल्यावर अग्निशमन दलाची वाहने तातडीने घटनास्थळावर दाखल झाली. दरम्यान, या आगीत आतापर्यंत ४ जण जखमी झाले असून त्यांना कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.



वर्सोवा येथील या सिलेंडरच्या गोदामाला नेमकी आग कशी लागली याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.

Web Title: Fire in Cylinder warehouse at Versova, Mumbai, 4 injured