Join us

२५ जण क्वारंटाइन असलेल्या कोविड केअर सेंटरला आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 20:21 IST

ते हॉटेल मुंबई महापालिकेच्या ई प्रभागाकडून कोविड केअर सेंटर म्हणून घोषित करण्यात आले होते.

ठळक मुद्देअग्निशमन दलाच्या जवानांनी ३ फायर इंजिन, २ वॉटर टँकरच्या मदतीने आग शमविण्याचे काम सुरु केले.या हॉटेलमध्ये म्हणजे या कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आलेल्या २५ जणांसह 2 कर्मचाऱ्यास अग्निशमन दलाच्या जवानांनी सुरक्षित बाहेर काढले.

मुंबई : मुंबई सेंट्रल येथील बेलासिस रोडवरील तळमजला अधिक पाच मजली रिपॉन पॅलेस या हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर मंगळवारी रात्री सव्वा सात वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. ज्या हॉटेललाआग लागली; ते हॉटेल मुंबई महापालिकेच्या ई प्रभागाकडून कोविड केअर सेंटर म्हणून घोषित करण्यात आले होते. या कोविड केअर सेंटरमध्ये २५ जणांना क्वारंटाइन करण्यात आले होते. मुंबई सेंट्रल येथील आगीची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी ३ फायर इंजिन, २ वॉटर टँकरच्या मदतीने आग शमविण्याचे काम सुरु केले.

 या हॉटेलमध्ये म्हणजे या कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आलेल्या २५ जणांसह 2 कर्मचाऱ्यास अग्निशमन दलाच्या जवानांनी सुरक्षित बाहेर काढले. सुदैवाने या आगीच्या दुर्घटनेत मनुष्यहानी झाली नसून, रात्री उशिरापर्यंत येथील कुलिंग ऑपरेशन सुरु होते. दरम्यान, या आगीत इलेक्ट्रॉनिक साहित्य, बेड, लाकडी फर्निचर आणि एसी जळून खाक झाले आहे.

 

टॅग्स :आगमुंबईकोरोना वायरस बातम्याहॉटेल