Join us

मुंबईतल्या घाटकोपरमधल्या केमिकल फॅक्टरीला आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2018 05:35 IST

घाटकोपरमधल्या असल्फा व्हिलेज येथे असलेल्या केमिकल फॅक्टरीला भीषण आग लागली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत.

मुंबई- घाटकोपरमधल्या असल्फा व्हिलेज येथे असलेल्या केमिकल फॅक्टरीला भीषण आग लागली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. अग्निशामक दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. ही रात्री 11.45 ते 12.00 वाजताच्या दरम्यान ही आग लागली. आग विझवताना एक अग्निशामक दलाचा जवान जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, अशी माहिती अग्निशामक अधिकारी अभय काळे यांनी दिली आहे. 

 

टॅग्स :आगमुंबई