Join us

मालाडमध्ये बंगल्याला लागली आग; आग नियंत्रणात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2018 16:47 IST

आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र, आता अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग विझवली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

मुंबई - अंधेरीतील कामगार रुग्णालयाला लागलेल्या भीषण आगीत ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच आज दुसऱ्या दिवशी आगीची दुसरी घटना घडली आहे. मालाड पश्चिमेकडील मिलाप सिनेमा परिसरातील एका जुन्या बंगल्याला आग लागली आहे. या बंगल्याचं नाव केडिया आहे.  आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या असून बचावकार्य सुरू आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र, आता अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग विझवली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

टॅग्स :आगअंधेरीहॉस्पिटल