Join us

विलेपार्ले रेल्वे स्थानकाजवळ इमारतीला आग, जीवितहानी नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2019 20:25 IST

इमारतीमध्ये काहीजण अडकल्याची भीती

मुंबई : मुंबईतील विलेपार्ले स्टेशन परिसरात असलेल्या लाभ श्री व्हिला इमारतीला आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, लाभ श्री व्हिला इमारतीच्या 7 आणि 8 व्या मजल्यावर भीषण आग लागली आहे. आग लागल्याची माहिती समजताच घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाच्या दहा गाड्या दाखल झाल्या आहेत. ही आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून करण्यात येत आहे. 

दरम्यान, इमारतीत काही जण अडकले होते. मात्र त्यांची सुटका करण्यात आली. तसेच, या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

टॅग्स :आग