मुंबईत कांदिवली भागात दुमजली इमारतीला लागलेली भीषण आग नियंत्रणात
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2017 15:16 IST2017-09-23T11:53:15+5:302017-09-23T15:16:38+5:30
कांदिवलीच्या अशोकनगर भागातील एका दुमजली इमारतीमध्ये लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्यात आलं आहे.

मुंबईत कांदिवली भागात दुमजली इमारतीला लागलेली भीषण आग नियंत्रणात
मुंबई - कांदिवलीच्या अशोकनगर भागातील एका दुमजली इमारतीमध्ये भीषण आग भडकली होती. या भीषण आगीवर नियंत्रण मिळविण्यात फायर ब्रिगेडला यश आलं आहे. अग्निशमन दलाच्या जवानांच्या अथक प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आलं आहे. कांदिवली पूर्वेला अशोच चक्रवर्ती रोडवर बोनेनझा इस्टेट येथे ही दुमजली इमारत आहे.
#UPDATE Fire that broke out in a building in Kandivali area of Mumbai is now under control. pic.twitter.com/mwHnFVQMY9
— ANI (@ANI) September 23, 2017
अग्निशमन दलाला शनिवारी सकाळी 10 वाजून 20 मिनिटांना आग लागल्याचा फोन आला. लगेचच 15 मिनिटात अग्निशमन दलाच्या आठ गाडया, सात वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झाले.
या आगीत इमारतीमधील चार ते पाच गाळे जळून खाक झाले आहेत. सुदैवाने या आगीत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. आगीत अडकलेल्या चार ते पाच जणांची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुटका केली.