गोवंडीतील गोडाऊनला भीषण आग, फायर ब्रिगेडच्या 8 गाड्या घटनास्थळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2018 16:56 IST2018-03-19T14:36:03+5:302018-03-19T16:56:47+5:30
गोवंडीतील महाराष्ट्र कम्पाऊंडमध्ये असलेल्या गोडाऊनला भीषण आग लागली आहे.

गोवंडीतील गोडाऊनला भीषण आग, फायर ब्रिगेडच्या 8 गाड्या घटनास्थळी
मुंबई- गोवंडीतील महाराष्ट्र कम्पाऊंडमध्ये असलेल्या गोडाऊनला भीषण आग लागली होती. गोवंडी रोडवरील आयशा हॉलच्या बाजूला असलेल्या गोडाऊनला दुपारी दीड वाजेच्या सुमारास आग लागली. आग विझविण्यासाठी 8 फायर इंजिन, 4 जे.टी व 2 वॉटर टँकर घडनास्थळी दाखल झाले होते त्यांच्या सहाय्याने आग विझविण्यात आली. डेकोरेशन मटेरीअलचं हे गोडाऊन असून आगीत सामानाचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, आग विझविण्यात आली असून सध्या कुलिंग ऑपरेशन सुरू आहे.