अग्निशमन दलाकडून ९०७ ठिकाणी तपासणी; १६ आस्थापनांना नोटिसा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 14:58 IST2025-12-29T14:58:44+5:302025-12-29T14:58:44+5:30
उल्लंघनप्रकरणी कारवाई; नावे मात्र गुलदस्त्यात...

अग्निशमन दलाकडून ९०७ ठिकाणी तपासणी; १६ आस्थापनांना नोटिसा
म ंबई : नववर्षानिमित्ताने आयोजित स्वागत सोहळ्यांच्या पार्श्वभूमीवर मुंबई अग्निशमन दलाने ‘विशेष अग्निसुरक्षा मोहीम’ हाती घेतली आहे. याअंतर्गत हॉटेल्स, रेस्टॉरंट, पब, बार आदी ९०७ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी अटी व शर्तींचे पालन न करणाऱ्या ४१ आस्थापनांवर अग्निशमन दलाने कारवाई केली, तर १६ आस्थापनांना नोटिसा बजावल्या. नववर्षानिमित्ताने हॉटेल्स, पब, बार, गृहसंकुले व इमारती, समुद्रकिनारा आदी ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या पार्श्वभूमीवर अग्निसुरक्षेबाबत खबरदारीच्या अनुषंगाने आयुक्त भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार अतिरिक्त पालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली २२ ते २८ डिसेंबरदरम्यान ‘विशेष अग्निसुरक्षा मोहीम’ राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत १० मॉल्स, २५ पंचतारांकित हॉटेल्स, ५९ लॉजिंग-बोर्डिंग, १९ रूफ टॉप, १४८ पब, बार, क्लब, १२ पार्टी हॉल, ५ जिमखाना, ६२८ रेस्टॉरंट आदी मिळून एकूण ९०७ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी अटी व शर्तींचे उल्लंघन करणाऱ्या ४१ आस्थापनांवर कारवाई करण्यात आली, तर १६ आस्थापनांना नोटिसा बजावल्या. २८ डिसेंबरपर्यंत ही मोहीम सुरू राहणार असल्याचे जोशी यांनी सांगितले. उल्लंघनप्रकरणी कारवाई; नावे मात्र गुलदस्त्यात१६ आस्थापनांना नोटीस४१ आस्थापनांविरोधात कारवाई