Fire breaks out in Kurla West eight fire engines at the spot | VIDEO: कुर्ल्यातील इमारतीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी

VIDEO: कुर्ल्यातील इमारतीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी

मुंबई: कुर्ला पश्चिमेतील दुमजली इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहे. या रहिवासी इमारतीत काही जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. इमारतीमधून स्फोटाचे आवाज येत असल्यानं रहिवाशांचे सिलिंडर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कुर्ला पश्चिम येथील एस. जी. बर्वे मार्गावर असलेल्या पालिका एल विभागाच्या बाजूच्या मेहता इमारतीला भीषण आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या आठ गाड्या दाखल झाल्या आहेत. इमारतीमधून स्फोटाचे मोठे आवाज येत असल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या इमारतीमध्ये काही जण अडकल्याची शक्यता असल्यानं त्यांच्या बचावासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. 

Web Title: Fire breaks out in Kurla West eight fire engines at the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.