Mumbai Fire: दक्षिण मुंबईतभायखळा येथील सॅलसेट नावाच्या ५२ मजली उच्चभ्रू इमारतीला भीषण आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे. या घटनेमुळे भायखळा-परळ पुलावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. आगीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही.
सॅलसेट २७ नावाचा उच्चभ्रू ट्विन टॉवर भायखळ्यातील महागडा प्रोजेक्ट म्हणून ओळखला जातो. यात प्रत्येकी ५२ मजली असे दोन टॉवर आहेत. त्यातील एका टॉवरमध्ये ४५ मजल्यावर आग लागली आहे. यात अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. घटनास्थळावर अग्निशमन दलासह रुग्णवाहिका, मनपा प्रशासन आणि मुंबई पोलिसांचीही एक तुकडी पोहोचली आहे.