VIDEO: पवईतील कार सर्व्हिस सेंटरला भीषण आग; कोट्यवधींच्या गाड्या जळून खाक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2021 12:10 IST2021-11-18T11:45:14+5:302021-11-18T12:10:50+5:30
अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी; आग नियंत्रणाचे आणण्याचे प्रयत्न सुरू

VIDEO: पवईतील कार सर्व्हिस सेंटरला भीषण आग; कोट्यवधींच्या गाड्या जळून खाक
मुंबई: पवई परिसरातील साकी विहार रोड परिसरात भीषण अग्नितांडव पाहायला मिळत आहे. या भागात असलेल्या ह्युंदाईच्या सर्व्हिस सेंटरला भीषण आग लागली आहे. त्यामुळे परिसरात धुराचे लोट पाहायला मिळत आहेत. सध्या अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. त्यांच्याकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीत कोट्यवधींच्या गाड्या जळून खाक झाल्याची माहिती मिळत आहे.
मुंबई- पवईतील कार सर्व्हिस सेंटरला भीषण आग; कोट्यवधींच्या गाड्या जळून खाक https://t.co/CbvSFUjpi9pic.twitter.com/KI5cqVNjJ6
— Lokmat (@lokmat) November 18, 2021
पवईतील साकी विहार रोडवर एल अँड टी कंपनीच्या समोर साई ऑटो हुंडाईचं सर्व्हिस सेंटर आहे. या सेंटरला भीषण आग लागली आहे. आगीचे लोट पसरल्यानं सर्व्हिस सेंटर शेजारच्या महावीर क्लासिक या इमारतीत राहणाऱ्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पवई पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि वाहतूक विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. आगीमुळे आणि नागरिकांच्या प्रचंड गर्दीमुळे वाहतूक कोंडी होऊन मदत कार्याला उशीर होत आहे. सर्व्हिस सेंटर मोठमोठ्या स्फोटांचे आवाज होत आहेत. या आगीत कोट्यवधींच्या गाड्या असून त्या जळून खाक झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.