Join us

वाळकेश्वरमध्ये 31 मजली इमारतीच्या 17 आणि 18 व्या मजल्याला आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2017 17:27 IST

वाळकेश्वरमध्ये 31 मजली इमारतीमध्ये आग लागली आहे. इमारतीच्या 17 आणि 18 व्या मजल्याला आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या 7 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून बचावकार्य सुरु आहे.

मुंबई - वाळकेश्वरमध्ये 31 मजली इमारतीमध्ये आग लागली आहे. इमारतीच्या 17 आणि 18 व्या मजल्याला आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून बचावकार्य सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार वाळकेश्वर परिसरातील लिजेंड बिल्डिंगमध्ये ही आग लागली आहे. दुपारी जवळपास चार वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. 17व्या आणि 18 व्या माळ्यावर असणा-या ड्युप्लेक्स फ्लॅटमध्ये ही आगली. 

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या, तीन वॉटर टँकर आणि एक रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली आहे. आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु असून लोकांना सुरक्षितपणे इमारतीबाहेर काढण्याचं काम सुरु आहे. 

 

टॅग्स :आग