खारघर मध्ये इमारतीच्या १५ व्या मजल्याला आग

By Admin | Updated: January 28, 2016 01:26 IST2016-01-28T01:26:29+5:302016-01-28T01:26:29+5:30

खारघर मध्ये बुधवारी रात्री रात्री ८.३० च्या सुमारास गिरिराज होरायझन या इमारतीच्या १५ मजल्यावरीस रूम नं. १५०१ ला आग लागली. या आगीत जीवित हानी झाली नसली तरी लाखोंचे नुकसान झाले आहे.

Fire on the 15th floor of the building in Kharghar | खारघर मध्ये इमारतीच्या १५ व्या मजल्याला आग

खारघर मध्ये इमारतीच्या १५ व्या मजल्याला आग

पनवेल : खारघर मध्ये बुधवारी रात्री रात्री ८.३० च्या सुमारास गिरिराज होरायझन या इमारतीच्या १५ मजल्यावरीस रूम नं. १५०१ ला आग लागली. या आगीत जीवित हानी झाली नसली तरी लाखोंचे नुकसान झाले आहे.
एस. मुंडे यांच्या मालकीचा हा फ्लॅट होता. घरात ४ वर्षांची मुलगी माचिस घेवून खेळत असताना ही आग लागली. या वेळी तिची आजीसुद्धा त्या खोलीत होती. आग पसरल्याने त्या दोघीही घराबाहेर पडल्या. ही आग १४ व १६ मजल्यावर पसरली. अग्निशमन दलाच्या ८ गाडया घटनास्थळी झाल्या आणि आग आटोक्यात आणली. या वेळी खारघर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप काळे,अग्निशमन अधिकारी एस. शिंदे, प्रवीण बोडके हे अधिकारी उपस्थित होते. उच्चभ्रू सोसायटी असूनही या इमारतीतील फायर सेफ्टी यंत्रणा कुचकामी होती.

Web Title: Fire on the 15th floor of the building in Kharghar