कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 06:14 IST2025-12-27T06:13:44+5:302025-12-27T06:14:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खाद्य देणे दादरच्या एका व्यावसायिकला भोवले. वांद्रे न्यायालयाने त्याला दोषी ठरवत ...

कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खाद्य देणे दादरच्या एका व्यावसायिकला भोवले. वांद्रे न्यायालयाने त्याला दोषी ठरवत ५००० रुपयांचा दंड ठाेठावला. कबुतरांना खाद्य देण्याची ही कृती मानवी जीवनासाठी धोकादायक आजारांचा संसर्ग पसरविणारी असू शकते, असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदविले. अशा प्रकारची शिक्षा होण्याचे हे पहिलेच प्रकरण आहे.
नागरिकांचे आरोग्य विचारात घेत आणि सार्वजनिक उपद्रव होत असल्याचे कारण देत मुंबई महापालिकेने शहरातील बहुतांशी भागांत कबुतरांना खाद्य देण्यास बंदी घातली आहे. या पार्श्वभूमीवर कबुतरखान्यांवर पालिकेची नजर आहे. दादर येथील रहिवासी नितीन शेट (वय ५२) यांना १ ऑगस्ट रोजी शहरातील माहीम परिसरातील बंद असलेल्या ‘कबुतरखाना’ येथे कबुतरांना धान्य टाकताना पकडण्यात आले. वांद्रे येथील अतिरिक्त मुख्य न्यायिक दंडाधिकारी व्ही. यू. मिसाळ यांनी २२ डिसेंबर रोजी शेट यांनी आपली चूक झाल्याचे मान्य करून सौम्य शिक्षा देण्याची विनंती केली. त्यांची ही विनंती मान्य करत न्यायालयाने त्यांना ५००० रु. दंडाची शिक्षा सुनावली. भारतीय न्याय संहिता कलम २२३(ब) आणि २७१ अंतर्गत आरोप ठेवले हाेते.