Fine killing of a cat for Rs | क्रूरपणे मांजराची हत्या करणाऱ्याला ९ हजारांचा दंड
क्रूरपणे मांजराची हत्या करणाऱ्याला ९ हजारांचा दंड

मुंबई : मांजराची हत्या अत्यंत क्रूरपणे करणाºया ४० वर्षीय व्यक्तीला दंडाधिकारी न्यायालयाने ९,१५० रुपयांचा दंड ठोठाविला. गेल्या वर्षी चेंबूरमध्ये ही घटना घडली होती.
गेल्या महिन्यात दंडाधिकारी आर. एस. पाजंकर यांनी संबंधित व्यक्तीला भारतीय दंडसंहिता कलम ४२८ (प्राण्याची हत्या करणे), २०१ (पुरावे नष्ट करणे) व प्रिव्हेन्शन आॅफ क्रुअ‍ॅल्टी टू अ‍ॅनिमल्स अ‍ॅक्ट अंतर्गत दोषी ठरविले.
मे २०१८ मध्ये आरोपीने मांजराची क्रूरपणे हत्या केली आणि तिच्या मृत शरीराची विल्हेवाट चेंबूर येथील इंदिरानगर येथे लावली.
आरसीएफ पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक निराली रोहित यांच्या तक्रारीवरून आरोपीवर गुन्हा नोंदविण्यात आला.
आरोपीने त्याचा गुन्हा मान्य करीत कमीतकमी शिक्षा देण्याची विनंती दंडाधिकाऱ्यांना केली.
गुन्हा मान्य करण्यासाठी कोणीही दबाव आणला नाही, असे आरोपीने मान्य केल्याने त्याची विनंती मान्य करण्यात आली, असे दंडाधिकारींनी म्हटले. आरोपी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या आजारी असल्याने त्याला शिक्षा देताना सहानुभूती दाखविण्यात येत आहे, असे दंडाधिकारींनी निकालात म्हटले
आहे.

Web Title:  Fine killing of a cat for Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.