Finally ST bus washed; Use of sanitizer by ST staff | अखेर एसटीची बस धुतली; एसटीच्या कर्मचाऱ्यांकडून सॅनिटायझरचा वापर सुरू

अखेर एसटीची बस धुतली; एसटीच्या कर्मचाऱ्यांकडून सॅनिटायझरचा वापर सुरू

- कुलदीप घायवट 

मुंबई : एसटी महामंडळाकडून एसटी बस धुण्यास आणि एसटीच्या कर्मचाऱ्यांकडून सॅनिटायझरचा वापर करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा पुरवणाºया कर्मचाºयांचा एसटीचा प्रवास निर्जंतुकीकरण केलेल्या बसमधून सुरू झाला आहे. एसटी महामंडळाकडून कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी खबरदारी घेतली जात आहे.

‘लोकमत’ने २८ मार्च रोजी ‘एसटी महामंडळाचा फक्त एक दिवसाचा दिखावा’ हे वृत्त प्रकाशित करताच खडबडून जागे झालेल्या एसटी महामंडळाने एसटी बस धुण्यास आणि सॅनिटायझर देण्यास सुरुवात केली.

एसटीच्या प्रवासामध्ये कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बसस्थानके धुणे, एसटी कर्मचाºयांना मास्क व सॅनिटायझरची बाटली देणे, अशा खबरदारीच्या सूचना परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिल्या होत्या. मात्र एसटी महामंडळाकडून या सूचनांचे पालन एक दिवसासाठी केले. परिणामी एसटी कर्मचाºयांसह अत्यावश्यक सेवा देणाºया कर्मचाºयांच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहिला आहे.

प्रवाशांच्या संपर्कात येत असलेल्या एसटी कर्मचाºयांना कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी एसटी महामंडळाच्या कर्मचाºयांना दररोज सॅनिटायझर पुरविण्यात यावे, अशा सूचना परब यांनी दिल्या होत्या. मात्र महामंडळाकडे सॅनिटायझरच्या रिकाम्या बाटल्यांचा तुटवडा झाल्याने सॅनिटायझर पुरविणे कठीण जात होते. मात्र ‘लोकमत’च्या वृत्ताने एसटी महामंडळाने एसटी बस धुवण्यास आणि सॅनिटायझर देण्यास सुरुवात केली.

कोरोनामुळे अत्यावश्यक सेवा पुरवणाºया कर्मचाºयांसाठी एसटी महामंडळाकडून एसटी सेवा पुरविण्यात येत आहे. या प्रवाशांचा एसटीचा प्रवास सुरक्षित आणि कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी गाड्याची स्वच्छता करण्यास सुरुवात केली आहे. मुंबई सेंट्रल आगारातील सफाई कर्मचाºयाकडून एसटी बसचे निर्जंतुकीकरण केले जात आहे. यासह सॅनिटायझरच्या बाटल्यांचा पुरवठा करण्यास सुरुवात केली आहे.

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी, २४ मार्चपासून लॉक डाऊन करण्यात आले. त्यामुळे रेल्वे व अन्य वाहतूक व्यवस्था बंद करण्यात आली. मात्र एसटी महामंडळाकडून अत्यावश्यक सेवासाठी मुंबई, ठाणे व पालघर या तिन्ही विभागातून बस सोडण्यात येत आहेत.

‘कामावर या, नाही तर थेट निलंबित’

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने संपूर्ण देशात २४ मार्चपासून लॉकडाउन सुरू आहे. त्यामुळे संपूर्ण सार्वजनिक वाहतूक बंद झाली आहे. फक्त अत्यावश्यक सेवा देणाºया कर्मचाºयांसाठी एसटीची सेवा सुरू आहे. मात्र या सेवा कमी पडत असल्याने जादा फेºया चालविण्यात येणार आहेत. यासाठी एसटी महामंडळाने कर्मचाºयांना कामावर येण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाचे पालन न झाल्यास थेट निलंबित करण्याचे आदेश एसटीचे महाव्यवस्थापक राहुल तोरो यांनी दिलेत.

Web Title: Finally ST bus washed; Use of sanitizer by ST staff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.