Join us  

अखेर ‘ती’ जागा राष्ट्रवादीला; महाविकास आघाडीत काँग्रेसनं दावा सोडला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2020 2:11 AM

विधानसभा उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे नरहरी झिरवळ यांनी तर भाजपतर्फे माजी मंत्री डॉ. अशोक उईके यांनी शुक्रवारी अर्ज भरला.

मुंबई : महाविकास आघाडीत राष्ट्रवादी दोन आणि शिवसेनाकाँग्रेस प्रत्येकी एक जागा लढवित आहे. एकूण सात जागांसाठी आठ अर्ज आले असले तरी ही निवडणूक बिनविरोध होणार हे निश्चित मानले जाते. एका जागेसाठी काँग्रेस व राष्ट्रवादीत स्पर्धा होती पण अखेर ती जागा राष्ट्रवादीला देण्यात आली.

राष्ट्रवादीतर्फे पक्षाध्यक्ष शरद पवार, माजी राज्यमंत्री फौजिया खान, काँग्रेसतर्फे राजीव सातव, शिवसेनेतर्फे प्रियंका चतुर्वेदी तर भाजपतर्फे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, उदयनराजे भोसले, डॉ. भागवत कराड यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड होईल, असे चित्र आहे. फौजिया खान, सातव, चतुर्वेदी, डॉ. कराड व किशोर चव्हाण यांनी शुक्रवारी अर्ज भरला. पण चव्हाण यांच्या अर्जावर सूचक, अनुमोदक म्हणून एकाही आमदाराची सही नाही.

झिरवळ आणि उईकेंचे अर्जविधानसभा उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे नरहरी झिरवळ यांनी तर भाजपतर्फे माजी मंत्री डॉ. अशोक उईके यांनी शुक्रवारी अर्ज भरला. मात्र उईके हे श्निवारी माघार घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे झिरवळ यांची बिनविरोध निवड होईल. झिरवळ हे दिंडोरीचे आमदार आहेत.

टॅग्स :राज्यसभाशिवसेनाराष्ट्रवादी काँग्रेसकाँग्रेस