Join us

अखेर एमटीएनएल कर्मचाऱ्यांचे एप्रिलचे वेतन खात्यात जमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2019 05:27 IST

महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एमटीएनएल)च्या कर्मचाऱ्यांचे एप्रिल महिन्याचे वेतन शनिवारी ४ मे रोजी कर्मचाºयांच्या खात्यात जमा करण्यात आले.

मुंबई : महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एमटीएनएल)च्या कर्मचाऱ्यांचे एप्रिल महिन्याचे वेतन शनिवारी ४ मे रोजी कर्मचाºयांच्या खात्यात जमा करण्यात आले. त्यामुळे कर्मचाºयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. गेल्या काही महिन्यांपासून एमटीएनएल कर्मचाºयांच्या वेतनाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यापूर्वी महिन्याच्या शेवटच्या दिवशी होणारे वेतन आता दुसºया महिन्यात होत असल्याने कर्मचाºयांना सातत्याने आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सरकारने या नेहमी उद्भवणाºया समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी कर्मचाºयांमधून केली जात आहे.विशेष म्हणजे एमटीएनएलचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक पी.के. पुरवार यांनी एप्रिल महिन्याचे वेतन एप्रिल महिन्याअखेरीस होईल, अशी ग्वाही दिल्यानंतरही वेळेवर वेतन झाले नाही. त्यामुळे कर्मचाºयांमध्ये नाराजीचे वातावरण होते. अखेर शनिवारी वेतन झाल्याने कर्मचाºयांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :एमटीएनएलकर्मचारी