Final year students waiting for marks | अंतिम वर्षाचे विद्यार्थी गुणपत्रिकेच्या प्रतीक्षेत

अंतिम वर्षाचे विद्यार्थी गुणपत्रिकेच्या प्रतीक्षेत

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एप्रिल-मे मध्ये होणारी अंतिम वर्षाची परीक्षा सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये झाली. मुंबई विद्यापीठाने निकालही तातडीने लावला. मात्र अद्याप विद्यार्थ्यांना गुणपत्रिका देण्यात आली नाही. गुणपित्रका न मिळाल्याने विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी व नोकरीसाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे तातडीने गुणपत्रिका देण्यासाठी ठाेस उपाययाेजना हाती घ्यावी, अशी मागणी मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रदीप सावंत व राजन कोळंबेकर यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांना पत्राद्वारे केली. आयडॉलच्या विद्यार्थीही गुणपत्रिकेच्या प्रतीक्षेत आहेत.

कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती हलाखीची असताना केवळ गुणपत्रिका वेळेवर न दिल्याने नोकरी गमावणे परवडणारे नसल्याची प्रतिक्रिया बीकॉमची परीक्षा आयडॉलमधून पास झालेल्या विद्यार्थ्याने दिली. लवकरात लवकर गुणपत्रिका द्यावी किंवा आम्हाला पर्यायी लिखित प्रमाणपत्र तरी द्यावे, अशी मागणी विद्यार्थी करीत आहेत.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Final year students waiting for marks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.