Join us  

फिल्म इंडस्ट्री 'नशेडी', मग पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेटायला का बोलावलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2020 2:44 PM

कंगना राणौतने उर्मिलाला टार्गेट करताना म्हणाले की, माझ्या स्ट्रगलची थट्टा करते आहे. कंगनाने उर्मिलावर खासगी हल्ला करत तिला सॉफ्ट पॉर्न स्टार म्हटले. इतकेच नाही तर त्याशिवाय उर्मिला आपल्या अभिनयासाठी ओळखली जात नाही, असेही कंगनाने म्हटले होते

ठळक मुद्देकंगना राणौतने उर्मिलाला टार्गेट करताना म्हणाले की, माझ्या स्ट्रगलची थट्टा करते आहे. कंगनाने उर्मिलावर खासगी हल्ला करत तिला सॉफ्ट पॉर्न स्टार म्हटले. इतकेच नाही तर त्याशिवाय उर्मिला आपल्या अभिनयासाठी ओळखली जात नाही, असेही कंगनाने म्हटले होते

मुंबई - बॉलिवूडची क्वीन अभिनेत्री कंगना राणौतने इंडस्ट्रीतल्या घराणेशाही आणि गटबाजीच्या विरोधात बंड पुकारला आहे. कंगनाने उर्मिला मातोंडकरवर पलटवार करत तिला सॉफ्ट पॉर्न स्टार असे संबोधले. नुकतेच उर्मिलाने कंगनावर निशाणा साधला होता. त्यावेळी ती म्हणाली होती की, कंगना उगाचच महिला कार्ड खेळते आहे. तिला जर ड्रग्सला घेऊन लढायचं आहे तर तिने याची सुरूवात तिचे राज्य हिमाचल प्रदेशमधून केली पाहिजे. तसेच, बॉलिवूड जर नशेडी असेल तर पंतप्रधान मोदींनी भेटायला कसं बोलावलं? असा प्रश्न उर्मिलाने विचारला आहे 

कंगना राणौतने उर्मिलाला टार्गेट करताना म्हणाले की, माझ्या स्ट्रगलची थट्टा करते आहे. कंगनाने उर्मिलावर खासगी हल्ला करत तिला सॉफ्ट पॉर्न स्टार म्हटले. इतकेच नाही तर त्याशिवाय उर्मिला आपल्या अभिनयासाठी ओळखली जात नाही, असेही कंगनाने म्हटले होते. कंगनाच्या या टीकेला उर्मिलाने उत्तर दिलंय. तसेच, कंगनावर टीकाही केली आहे. खासदार जया बच्चन यांनी संसदेत बॉलिवूडवरील ड्रग्जसच्या आरोपावर बोलताना, काही लोक ज्या थाळीत खातात, तिथेच छेद करतात, असे म्हटले होते. त्यावर, कंगनाने जया बच्चन यांना लक्ष्य करत बच्चन कुटुंबीयांवर निशाणा साधला होता. त्यानंतर, उर्मिला आणि कंगन असा वाद रंगला आहे. 

उर्मिलाने कंगनावर टीका करताना म्हटले की, जर आमची इंडस्ट्री नशेडी लोकांचा अड्डा असेल तर, गेल्या कित्येक वर्षांपासून देशातील सर्वात मोठी इंडस्ट्री कशी राहिली?. या इंडस्ट्रीत मोठ-मोठे लोक आले, ज्यांनी चित्रपटाच्या माध्यमातून देशाला नवी दिशा दिली. राज कपूर आणि दिलीप कुमार यांसारख्या दिग्गजांनी देशाला अनेक चित्रपट दिले. आज बॉलिवूड इंडस्ट्री जगातील सर्वात मोठी इंडस्ट्री असल्याचे उर्मिलाने सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या नशेडी इंडस्ट्रीला भेटायला बोलावले. महात्मा गांधींच्या विचारांना पुढे नेण्याचं आवाहनही मोदींनी केलं. जर ही संपूर्ण इंडस्ट्री नशेडी आहे, तर पंतप्रधान मोदींनी त्यांची साथ का मागितली? असा प्रश्नही उर्मिलाने एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत विचारला आहे.   

मी कधीच ड्रग्स विकत घेतले नाही- कंगना

टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत कंगना म्हणाली की, मला राजकारणात तिकिट मिळवण्यासाठी कोणती अडचण येणार नाही कारण उर्मिलाकडेदेखील एक आहे. जेव्हा तिला तिकिट मिळू शकते तर मला का नाही मिळू शकत. सर्वांना तिकिट मिळत आहे. मी माझ्या आयुष्यासोबत का खेळू, माझं घर का तोडलं? कंगनाने स्वतःला शंभर टक्के निर्मळ असल्याचं सांगत अध्ययन सुमनने केलेल्या विधानावर देखील आपलं मत सांगितले. काही वर्षांपूर्वी अध्ययने आरोप केले होते की कंगना राणौतने त्याला जबरदस्ती ड्रग्स दिले. त्यावर कंगना बोलली की, मी आतापर्यंत कोणत्या ड्रग पॅडलरला फोन केला नाही. मी कधीच ड्रग्स विकत घेतले नाही. परंतु हो, मी लोकांसमोर एक्झपोज झाली आहे तर मला ही गोष्ट स्पष्ट दिसते आहे. मी पाहिले आहे भारताला कशाप्रकारे ड्रग्सपासून नुकसान होतंय विशेष करून पंजाबला.

उर्मिला मातोंडकरने साधला कंगनावर निशाणा

कंगना राणौतने मुंबईला पाकव्याप्त काश्मीर संबोधले होते. त्यानंतर तिला खूप विरोध झाला होता. याशिवाय कंगनाने म्हटले होते की बॉलिवूडमध्ये असे कित्येक लोक आहेत जे ड्रग्सचं सेवन करतात आणि त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. या विधानांवर उर्मिला मातोंडकरने कंगनाला चांगलेच सुनावले. उर्मिला म्हणाली की, संपूर्ण देश ड्रग्स समस्याने पीडित आहे. काय कंगनाला माहित नाही आहे की हिमाचल ड्रग्सचा गड आहे? तिला ही लढाई आपल्या गृह राज्यातून सुरू केली पाहिजे.

मुंबईबद्दल अपमानास्पद वक्तव्य खपवून घेणार नाही - उर्मिला

उर्मिला पुढे म्हणाली होती की, या मॅडमला वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरविण्यात आली, याचा पैसा कोण देतं. तुमच्या आमच्यासारखा टॅक्स पेयर माणूसचं तिच्या सुरक्षेचा खर्च उचलतोय. पोलिसांना ड्रग्स नेक्ससबद्दल का सांगत नाही? या गोष्टीत कोणतीही शंका नाही की मुंबई आणि बॉलिवूड सर्वांचे आहे. ज्याने या शहरावर प्रेम केले आहे आणि त्याला काहीतरी दिले आहे तर हे शहर त्यांचे आहे. या शहराची मुलगी असल्याच्या नात्याने त्याचा अपमानास्पद कोणतेही विधान ऐकून घेणार नाही. जेव्हा तुम्ही अशाप्रकारे टीका करता तेव्हा हे शहरच नाही तर तुम्ही इथल्या लोकांचा अपमान करत आहात. उर्मिला पुढे म्हणाली की, जर कुणी प्रत्येक वेळेला ओरडतोय तर ते गरजेचे नाही की तो खरे बोलतो आहे.

टॅग्स :उर्मिला मातोंडकरकंगना राणौतकोरोना वायरस बातम्याशिवसेनानरेंद्र मोदी