Join us  

मुंब्रा गर्भवती महिला प्रकरणी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सोमय्या यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2020 8:02 PM

आयुक्तांशी झालेल्या बैठकीत हा मृत्यू म्हणजे राज्य सरकार आणि ठाणे महानगरपालिकेचा आरोग्य विभाग यांचे सपशेल अपयश असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला. 

ठळक मुद्दे तिच्या मृत्यूला सरकारचा बेजबाबदारपणा कारणीभूत असून सर्व दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली.पुढील काळात फक्त ठाणे आणि मुंबईमध्येच जवळपास एक लाख नागरिक कोरोनाबाधित होणार असून यासंदर्भात उद्धव सरकारकडे काय रणनीती आहे, असा सवाल त्यांनी केला.

ठाणे - रुग्णालयांनी दाखल करून न घेतल्याने मुंब्रा येथील महिलेचा रुग्णालयाच्या दारातच झालेल्या दुर्दैवी मृत्यू प्रकरणी सरकारला घेरण्याचा निश्चय भाजप नेत्यांनी केल्याचे दिसत आहे. सोमवारी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या, भाजपाचे ठाणे शहर अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे आणि नगरसेवक संजय वाघुले यांनी मुंब्रा येथे जाऊन पीडित महिलेच्या कुटुंबियांना भेटण्याची परवानगी पोलीस आयुक्तांनी नाकारली होती. यावेळी आयुक्तांशी झालेल्या बैठकीत हा मृत्यू म्हणजे राज्य सरकार आणि ठाणे महानगरपालिकेचा आरोग्य विभाग यांचे सपशेल अपयश असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला. 

 

आरपीआय नेत्याच्या फार्महाऊसवर हल्ला, गार्डवर केला गोळीबार

 

खळबळजनक! भरदिवसा चाकूचा धाक दाखवून लुटले लाखो रुपये, आमदार निवासजवळील घटना 

 

तिच्या मृत्यूला सरकारचा बेजबाबदारपणा कारणीभूत असून सर्व दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली. अशा प्रकारे गोरगरिबांचे मृत्यू होत आहेत. पण आरोग्यमंत्री मात्र फेसबुकवर आपला फेस दाखविण्यात मग्न असल्याची जोरदार टीका त्यांनी केली. खाजगी रुग्णालये रुग्णांना लुटत असल्याने गरिबांना कोणी वालीच उरला नसल्याचे ते म्हणाले. कोव्हीडसाठी सर्व रुग्णालये आरक्षित केली जातं असल्याने गर्भवती महिला आणि इतर गंभीर आजार झालेल्यांचे अतोनात हाल होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. पुढील काळात फक्त ठाणे आणि मुंबईमध्येच जवळपास एक लाख नागरिक कोरोनाबाधित होणार असून यासंदर्भात उद्धव सरकारकडे काय रणनीती आहे, असा सवाल त्यांनी केला.

टॅग्स :किरीट सोमय्याउद्धव ठाकरेमुंब्रागर्भवती महिलामृत्यू