सामग्री महागल्याने देवीच्या मूर्तींच्या किमतीत २0 टक्क्यांनी वाढ
By Admin | Updated: September 26, 2016 14:00 IST2016-09-26T14:00:53+5:302016-09-26T14:00:53+5:30
नवरात्रौत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असून कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्याने देवीच्या मूर्तींची किंमतही वाढली आहे.

सामग्री महागल्याने देवीच्या मूर्तींच्या किमतीत २0 टक्क्यांनी वाढ
राहुल वाडेकर, ऑनलाइन लोकमत
विक्रमगड (पालघर), दि. २६ - अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवरात्र उत्सवाची तयारी अंतीम टप्प्यात येऊन पोहचली आहे. देवीच्या विविध प्रकारच्या मूर्ती बाजारपेठेत दाखल झाल्या आहेत.मात्र मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षीही कच्चा मालाच्या किंमतीत १५ तेक २0 टक्क्यांनी वाढ झाल्याने ग्राहकांना या देवीच्या मूर्ती घेण्यासाठी अधिक किंमत मोजावी लागणार आहे.त्यामुळे नवरात्र उत्सवातील देवीच्या मूर्तींनाही महागाईची झळ पोहचली आहे.
विक्रमगड व परिसरात नवरात्र उत्सव मोठया भक्तीभावी वातारणात व धुमधडाक्यात साजरा केला जातो.विविध मंडळे आणि घरामध्ये मनोभावे देवीच्या मूर्तीची स्थापना केली जाते.मात्र या वर्षी देवीच्या मूर्तीची किंमत १५ ते २0 टक्क्यांनी वाढली आहे. ग्राहकांना मागील वर्षी दीड फुटांची मूर्ती १३00 ते १४00 रुपयांना मिळत होती.ती आता १५00 ते १६00 रुपयांच्या घरात जाणार आहे. देवीच्या मूर्तीचे साचे बनविण्यासाठी लागणारी षाडूची माती गुजरात येथून आणली जाते.त्यामुळे मूर्तिकारांना एका गोणीला सध्या २00 ते ३00 रुपये मोजावे लागतात.
पर्यावरणामध्ये प्रदूषण होऊ नये यासाठी प्लास्टिक ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनवितांना त्यात जिप्स्मचा वापर केला जातो, त्यामुळे ते पाण्यात लवकर विरघळते. त्याच्या १ गोणीची किंमत २५0 ते ३00 रुपये आहे. तसेच काथ्याच्या एका बंडलची किंमत ९00 ते ९५0 रुपयांपर्यत पोहचली आहे. त्याचबरोबर ग्राहकांची नैसर्गीक रंगाला अधिक मागणी आहे. त्यामुळे मूर्तीना नैसर्गीक रंगच द्यावा लागतो. मात्र त्याची किंमत ही इतर रंगापेक्षा अधिक असून स्कीन कलरचा वापर जास्त असतो त्याचीही किंमत महागली आहे.
विक्रमगड येथील एकनाथ व्यापारी यांच्या चित्रशाळेमध्ये ऑर्डरप्रमाणे देवीच्या मूर्ती तयार केलया जात आहेत. मागील चार पाच महिन्यापासून हे काम सुरु असून आत ते अंतीम टप्प्यात आले आहे.
अलंकार व साडीच्या सजावटींमुळे दरवाढ
- नवरात्रीमध्ये देवीच्या मूर्तीचे अलंकार आणि सजावटीला अधिक महत्व असते.त्यानुसार कारागीर मूर्तींची रंगरंगोटी करत असतात.मात्र मागील वर्षापासून जरी,चमकी आणि वेल्वेटच्या रंगापासून तयार करण्यांत आलेल्या देवीच्या साडीला ग्राहकांची मोठी मागणी आहे.
- यामध्ये लाल, हिरवा, गुलाबी, पांढरा, भगवा आदी रंगाचा प्रामुख्याने उपयोग केला जातो.या रंगामुळे मूर्ती चमकत असून रात्रीच्या वेळी ती अधिक आकर्षक वाटते. अशा प्रकारच्या मूर्तीची साडी तयार करण्यास कारागींराना जास्त वेळ लागतो.मात्र ग्राहकांची पसंती त्याला मोठया प्रमाणात असल्यामुळे तशीच निर्मिती होते. सप्तश्रृंगी, एकवीरा, तुळजाभवानी, वाघावर स्वार झालेली अंबामाता, सिंहावर बसलेली भारतमाता, आदी प्रकारच्या मूतीर्ंना मोठया प्रमाणात मागणी आहे. गणपतीच्या मूर्ती बनविण्यापेक्षा देवीच्या मूर्ती तयार करण्यास वेळ अधिक लागतो.तसेच मूर्तीचे डोळे सजीव भासतील असे साकारण्याला ही महत्त्व असते.
-एकनाथ व्यापारी, मुर्तीकार, चित्रशाळा विक्रमगड