Join us

तृतीयपंथीकडून महिला पोलिसाला मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2019 01:59 IST

महिला पोलीस शिवडी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. शुक्रवारी ड्युटीवर असताना

मुंबई : तृतीयपंथीमध्ये सुरू असलेले भांडण थांबविण्यासाठी गेलेल्या महिला पोलिसालाच मारहाण केल्याची घटना शुक्रवारी शिवडीत घडली. या प्रकरणी शिवडी पोलिसांनी तृतीयपंथीविरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

महिला पोलीस शिवडी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. शुक्रवारी ड्युटीवर असताना त्यांना महिला पोलीस शिपायाने शिवडी बोटहार्ड रोड येथे मदतीसाठी बोलावून घेतले. त्यानुसार, महिला पोलिसाने घटनास्थळी धाव घेतली. तेथे महिला व पुरुषांमध्ये भांडण सुरू होते़ त्यामध्ये काही तृतीयपंथी हे दारू पिऊन एकमेकांना मारहाण करत होते. महिला पोलीस यांनी त्यांना भांडण नका करू म्हणून बजावले. याच रागात एक तृतीयपंथी त्यांच्या अंगावर धावून आला. त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली. त्यास प्रतिकार करताच जवळ असलेल्या झाडूने त्यांना पुन्हा मारहाण केली. 

टॅग्स :मुंबईगुन्हेगारी