लालबाग सिलिंडर स्फोटप्रकरणी पिता-पुत्रावर मनुष्यवधाचा गुन्हा, डिस्चार्ज मिळाल्यानंतर हाेणार अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2020 07:39 AM2020-12-09T07:39:57+5:302020-12-09T07:41:16+5:30

Mumbai News : लालबाग येथील सिलिंडर स्फोटास कारणीभूत ठरल्याप्रकरणी मंगेश राणे, त्यांचा मुलगा यश यांच्याविरोधात काळाचौकी पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

Father and son charged in Lalbagh cylinder blast case | लालबाग सिलिंडर स्फोटप्रकरणी पिता-पुत्रावर मनुष्यवधाचा गुन्हा, डिस्चार्ज मिळाल्यानंतर हाेणार अटक

लालबाग सिलिंडर स्फोटप्रकरणी पिता-पुत्रावर मनुष्यवधाचा गुन्हा, डिस्चार्ज मिळाल्यानंतर हाेणार अटक

Next

- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : लालबाग येथील सिलिंडर स्फोटास कारणीभूत ठरल्याप्रकरणी मंगेश राणे, त्यांचा मुलगा यश यांच्याविरोधात काळाचौकी पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
लालबाग येथील साराभाई इमारतीत रविवारी घडलेल्या सिलिंडर स्फोटात दोन जणांचा मृत्यू झाला, तर १४ जण जखमी झाले. लग्नघरात ही घटना घडली. काळाचौकी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राणे यांचा कॅटरिंगचा व्यवसाय आहे. गॅस गळती झाल्याचे काही नागरिकांच्या लक्षात आले हाेते. पण काही पावले उचलण्याआधीच स्फाेट झाला.
स्फाेटात राणे पिता-पुत्रही गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कामगार, स्थानिक, नातेवाईक यांचे जबाब नोंदवित आहाेत. दाेघांना रुग्णालयातून सोडल्यानंतर अटकेची कारवाई हाेईल, असे पाेलिसांनी सांगितले. 

...तर दुर्घटना टळली असती
स्फोटापूर्वीच इमारतीतील रहिवाशांना गॅसगळतीची झाल्याचे समजले हाेते. वेळीच याबाबत सतर्कता बाळगली असती तर दुर्घटना टळली असती, अशी माहिती काही जणांच्या जबाबातून समोर येत आहे.
मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दाेन लाखांची मदत
दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी दोन लाख रुपये, तर जखमींना पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी जाहीर केले.

Web Title: Father and son charged in Lalbagh cylinder blast case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.