Join us

तायक्वांदो प्रशिक्षकावर जीवघेणा हल्ला; त्रिकुटाला अटक, शिवाजी पार्क पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 13:36 IST

खिलारी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : विद्यार्थ्यांना शिवीगाळ करणाऱ्याला जाब विचारला म्हणून तायक्वांदो प्रशिक्षक राजेश खिलारी (५६) यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना शिवाजी पार्क परिसरात बुधवारी घडली. हल्ल्यात खिलारी जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी मनजीतसिंग तेजिंदर सिंग, इम्रान नूर मोहम्मद शेख आणि मनीष विग यांना अटक करण्यात आली आहे. यातील सिंग, शेख यांच्याविरोधात विनयभंग आणि हाणामारीचे गुन्हे नोंद आहेत.

स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाजवळच हा हल्ला झाला. याच परिसरात खिलारी हे तायक्वांदोचे प्रशिक्षण वर्ग घेतात. बुधवारी साडेआठच्या सुमारास वर्ग सुटल्यानंतर घरी निघालेल्या काही विद्यार्थ्यांना आरोपींनी चिडवत शिवीगाळ सुरू केली. विद्यार्थ्यांनी खिलारी यांना कॉल करून घडलेला प्रकार सांगताच त्यांनी त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जाब विचारला तेव्हा आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांच्यावर चाकू आणि बॅटने हल्ला चढवला.

अँटॉपहील परिसरातून आरोपींना अटकहाणामारीच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली. खिलारी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला. पोलिस उपायुक्त गणेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथके नेमून आरोपींचा सीसीटीव्हींच्या मदतीने शोध सुरू केला. सीसीटीव्हींच्या मदतीने यातील रेकॉर्डवरील आरोपींची ओळख पटताच त्यांना अँटॉपहील परिसरातून बेड्या ठोकल्या आहेत.

टॅग्स :मुंबई पोलीसगुन्हेगारी