मुंबई : तरुण शेतक-याने मंत्रालयासमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न शुक्रवारी सायंकाळी केला. या शेतक-याचे नाव मारूती सदाशिव घावटे असून तो २८ वर्षांचा आहे. धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील या शेतक-याने जमिनीचा योग्य मोबदला मिळावा म्हणून विष प्राशन करुन आत्महत्या केली. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे शेतकरी आत्महत्येची पुनरावृत्ती टळली.शेतातील ऊस घेवून जाण्यासाठी रस्ता नसल्याने शेतातील उभे पीक जाळावे लागले. सरकारी यंत्रणेकडे दाद मागूनही त्याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे मारुतीने शुक्रवारी मंत्रालयासमोर विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.
मंत्रालयासमोर शेतक-याचा आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 04:20 IST