Join us

मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर शेतकऱ्यांनी फेकल्या भाज्या, पोलिसांचा जाच झाला असह्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2018 17:45 IST

आज दुपारी त्यांनी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर भाज्या टाकून आंदोलन केलं.

मुंबई - मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर भाज्या फेकून शेतकऱ्यांनी आंदोलन केलं आहे. आज दुपारी बोरवली येथे नियमीत बाजारामध्ये भाज्या विकणाऱ्या शेतकऱ्यांनी मंत्रालयाच्या गेटसमोर भाज्या टाकून आंदोलन केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोरीवली येथे बाजारामध्ये भाजीविक्री करणाऱ्या या शेतकऱ्यांना पोलिस आणि बीएमसीचे आधिकारी सतत हाप्ता मागत होते. त्याला कंटाळून शेवटी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. आज दुपारी त्यांनी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर भाज्या टाकून आंदोलन केलं.

उस्मानाबादमधील भूम तालुक्यातील हे शेतककरी आहेत. ते बोरीवलीमध्ये नियमीत भाज्या विकत असतात. पण त्यांना तिथे नियमीत पोलिस आणि बिएमसीच्या आधिकाऱ्यांचा त्रास होतो. सततच्या त्रासाला कंटाळून त्यांनी आज मंत्रालयाच्या प्रवेशद्वारासमोर भाज्या टाकून आपला राग व्यक्त केला. 

बोरीवलीमधून त्यांनी कॅरेटमध्ये भाज्या भरून आणल्या होत्या. यामध्ये मिरची, बटाटा, कांदा, लसून आणि कोथिंबीरीसारख्या भाज्या शेतातील उत्पादने होती. कॅरेटच्या कॅरेट मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर टाकून आंदोलन केलं.

टॅग्स :शेतकरीसंप