Fake smart card maker arrested | फेक स्मार्ट कार्ड बनविणारे अटकेत

फेक स्मार्ट कार्ड बनविणारे अटकेत

मुंबई : बनावट आरसी स्मार्ट बुक बनविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात क्राईम ब्रँचच्या कक्ष १२ला यश मिळाले. सोमवारी त्यांनी याप्रकरणी कांदिवलीमधून दोघांच्या मुसक्या आवळल्या असून, त्यांच्याकडून बनावट कार्ड हस्तगत करण्यात आली आहेत. जयेश मेहता (५०) आणि अविनाश बोरकर (४०) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. जे कांदिवली व चारकोपचे राहणारे आहेत. कक्ष १२चे पोलीस निरीक्षक सचिन गवस यांना काही लोक बनावट स्मार्ट कार्ड बनवून देत असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार त्यांनी पथकासह सापळा रचत दहिसर पूर्व रेल्वे स्थानक परिसरात एका संशयिताला ताब्यात घेतले. वापरातून बाद झालेले स्मार्ट कार्ड विकत घेऊन नंतर विशिष्ट केमिकलच्या मदतीने त्यावरील माहिती पुसून, नंतर स्क्रीन प्रिंटिंग करीत विविध प्रादेशिक परिवहन विभागाचे कार्ड साथीदाराच्या मदतीने बनवत असल्याचे त्याने कबूल केले. त्यानुसार स्क्रीन प्रिंटिंग करणाºयाच्याही मुसक्या कक्ष १२ने आवळल्या. त्यांनी अशाच प्रकारे बनवलेली १८ स्मार्ट कार्ड, तसेच ते बनविण्यासाठी लागणारे साहित्य आणि मोबाइल हस्तगत केला आहे. त्यांनी आता अशा प्रकारे किती कार्ड तयार केली होती याची चौकशी पोलीस करत आहेत.
कक्ष १२चे प्रमुख महेश तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली गवस यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक अतुल आव्हाड आणि पथकाने ही कारवाई केली.

बनावट १८ स्मार्ट कार्ड हस्तगत
च्वापरातून बाद झालेले स्मार्ट कार्ड विकत घेऊन नंतर विशिष्ट केमिकलच्या मदतीने त्यावरील माहिती पुसून, नंतर स्क्रीन प्रिंटिंग करीत विविध प्रादेशिक परिवहन विभागाचे कार्ड साथीदाराच्या मदतीने बनवत असल्याचे त्याने कबूल केले.
च्अशाच प्रकारे बनवलेली १८ स्मार्ट कार्ड, तसेच ते बनविण्यासाठी लागणारे साहित्य आणि मोबाइल हस्तगत केला आहे.

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Fake smart card maker arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.