राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये बनावट औषधी खरेदी करण्यात आली; हसन मुश्रीफ यांची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 05:37 IST2025-03-06T05:35:53+5:302025-03-06T05:37:11+5:30

भाजपचे मोहन मते यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात मुश्रीफ यांनी सांगितले.

fake medicines were purchased in govt hospitals in the state minister hasan mushrif confesses in vidhan sabha | राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये बनावट औषधी खरेदी करण्यात आली; हसन मुश्रीफ यांची कबुली

राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये बनावट औषधी खरेदी करण्यात आली; हसन मुश्रीफ यांची कबुली

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्यातील काही शासकीय रुग्णालयांमध्ये बनावट औषधी खरेदी करण्यात आली, अशी कबुली वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी बुधवारी विधानसभेत दिली. 

भाजपचे मोहन मते यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात मुश्रीफ यांनी सांगितले की, अंबाजोगाई, येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ॲजिथ्रोमायसीन ५०० हे औषध बनावट असल्याचे निष्पन्न झाले आहे. नागपूरच्या मेडिकलमध्ये औषध खरेदी करण्यात आली नव्हते. तथापि, धाराशिव येथील शासकीय रुग्णालयात मॅक्समॅड २५० हे औषध बनावट असल्याचे निदर्शनास आले नाही. मात्र छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात मे. विशाल एंटरप्रायजेसने क्युरेक्सिम २०० या बनावट औषधांचा पुरवठा केल्याचे २३ डिसेंबर २०२४ रोजी निदर्शनास आले.

 

Web Title: fake medicines were purchased in govt hospitals in the state minister hasan mushrif confesses in vidhan sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.