फेसलेस लर्निंग लायसन्स प्रणाली हॅक; नेपाळसह परदेशी नागरिकांना परवाने, एजंटकडून यंत्रणेचा गैरवापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 07:14 IST2025-10-29T07:13:35+5:302025-10-29T07:14:07+5:30

राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने धोका ठरण्याची जाणकारांकडून भीती

Faceless learning license system hacked licenses for foreign citizens including Nepalis | फेसलेस लर्निंग लायसन्स प्रणाली हॅक; नेपाळसह परदेशी नागरिकांना परवाने, एजंटकडून यंत्रणेचा गैरवापर

फेसलेस लर्निंग लायसन्स प्रणाली हॅक; नेपाळसह परदेशी नागरिकांना परवाने, एजंटकडून यंत्रणेचा गैरवापर

महेश कोले

मुंबई : लर्निंग लायसन्स प्रक्रिया नागरिकांच्या सुविधेसाठी ‘फेसलेस’ करण्यात आली आहे; परंतु ती आता राष्ट्रीय सुरक्षेचा दृष्टीने मोठा धोका ठरत आहे. नॅशनल इन्फॉर्मेशन सेंटरच्या सुरक्षा सॉफ्टवेअरला (एनआयसी) बगल देऊन उमेदवाराशिवाय ‘लर्निंग लायसन्स’ चाचणी देणे आणि उत्तीर्ण होणे शक्य असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. एजंटकडून याचा गैरवापर करून परराज्यांसह नेपाळ आणि इतर देशांतील नागरिकांनाही लायसन्स दिले जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार सारथी पोर्टलवरील ‘ऑनलाइन लर्निग लायसन्स’ परीक्षा काही ठराविक आयपी ॲड्रेसवरून एकाच वेळी मोठ्या प्रमाणात देण्यात आल्या आहेत. दरम्यान, उमेदवाराची मातृभाषा मराठी असताना हिंदी भाषेत परीक्षा दिली. परिवहन विभागाने शोधलेल्या १० ठराविक कॉम्प्युटरच्या ‘आयपी ॲड्रेस’वरून तब्बल ५६० परीक्षा दिल्याचे उघड झाले. या परीक्षा मध्यरात्री १२ ते ३ च्या सुमारास सर्वाधिक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

एजंट उमेदवारांकडून एक लायसन्ससाठी ५ ते १० हजार रुपये घेत असून त्यांना घरबसल्या लायसन्स पोहोचवत असल्याचे परिवहन विभागातील सूत्रांनी सांगितले. दरम्यान, अशा प्रकारे रोज हजारो लर्निंग लायसन्स जारी केले जात असल्याने हा राष्ट्रीय सुरक्षेसाठी मोठा धोका ठरू शकतो, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

अशी दिली जाते वेबसाइटच्या सुरक्षेला बगल

वेबसाइटच्या डेव्हलपर टूलच्या माध्यमातून जावा कोड बदलला जातो. त्यानंतर ऑनलाइन फॉर्ममध्ये उमेदवाराची माहिती त्यामध्ये व्हेरिफिकेशनशिवाय भरली जाऊ शकते. अर्थात कोणाच्याही नावासमोर कोणाचाही फोटो लावता येऊ शकतो. आधारकार्ड व्हेरिफिकेशनची गरज नसते. परीक्षा देताना उमेदवारसुद्धा समोर असावे लागत नाही. लायसन्स जारी करण्याची कागदोपत्री जबाबदारी संबंधित आरटीओ अधिकाऱ्यांची असली तरी यामध्ये त्यांचा संबंध राहत नसल्याचे अधिकारी म्हणाले.

धोकादायक का?

गैरप्रकारामुळे परदेशी किंवा बेकायदेशीर स्थलांतरित व्यक्ती भारतीय नागरिकाच्या आधारकार्डवर आपला फोटो लावून सहज लर्निंग लायसन्स मिळवू शकतो. पुढे पक्क्या लायसन्स परीक्षेदरम्यान तोच व्यक्ती म्हणून हजेरी लावल्यास नाव आणि फोटो जुळत असल्याने त्याला लायसन्स मिळण्यात अडचण येत नाही. एकदा पक्के लायसन्स बनल्यावर तो भारतीय नागरिक म्हणून देशात वावरू शकतो. ­

आतापर्यंत तिघांवर गुन्हे

नागपूर आरटीओ कार्यालयांतर्गत लर्निंग लायसन्स परीक्षेदरम्यान ‘ई-केवायसी’ प्रणालीचा गैरवापर केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांनी परीक्षा न देता त्यांच्या मोबाइलवर आलेला ओटीपी इतर व्यक्तींना देऊन प्रक्रिया पूर्ण केली होती.

या प्रकाराबाबत आम्ही एनआयसीला याबद्दल कळवले असून बैठकसुद्धा झाली आहे. हे प्रतिबंध कसे करता येईल हे शोधण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे- विवेक भीमनवार, राज्य परिवहन आयुक्त

Web Title : फेसलेस लर्निंग लाइसेंस प्रणाली हैक; विदेशियों को अवैध रूप से लाइसेंस जारी।

Web Summary : महाराष्ट्र की फेसलेस लर्निंग लाइसेंस प्रणाली खतरे में है, जिससे एजेंट सुरक्षा को दरकिनार कर विदेशियों को लाइसेंस जारी कर रहे हैं। सॉफ्टवेयर कमजोरियों का फायदा उठाकर, आवेदक परीक्षा छोड़ रहे हैं, जिससे राष्ट्रीय सुरक्षा को खतरा है। धोखाधड़ी गतिविधियों की खोज के बाद जांच चल रही है।

Web Title : Faceless Learning License System Hacked; Foreigners Obtain Licenses Illegally.

Web Summary : Maharashtra's faceless learning license system is compromised, enabling agents to issue licenses to foreigners by bypassing security. Exploiting software vulnerabilities, applicants are skipping tests, posing national security threats. Investigations are underway following the discovery of fraudulent activities.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.