मुंबई - म्हाडाच्या विविध गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत २० टक्के सर्वसमावेशक घटकांतर्गत ५०२ घरांच्या लॉटरीकरिता ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज सादर करण्यासाठी २० मार्च रोजी रात्री ११.५९ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. नाशिक मंडळाची ही घरे मखमलाबाद, सातपूर, पाथर्डी, विहितगाव, हिरावाडी, म्हसरुळ, तपोवन द्वारका, वडाळा नाशिक, पिंपळगाव बहुला, नांदुर दसक, देवळाली, दसकमध्ये आहेत.
म्हाडाच्या घरांसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीला दिनांक ७ फेब्रुवारी रोजी सुरुवात झाली. आता सुधारित वेळापत्रकानुसार २० मार्च रोजी रात्री ११.५९ पर्यंत अर्ज नोंदणी करता येईल. नोंदणीकृत अर्जदारांना २० मार्च रोजी रात्री ११.५९ पर्यंत अर्ज सादर करता येईल. २१ मार्चच्या रात्री ११.५९ पर्यंत ऑनलाईन अनामत रक्कम भरता येईल. २१ मार्च रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत आरटीजीएस / एनईएफटीद्वारे अनामत रक्कम भरता येईल. लॉटरीसाठीची अंतिम यादी ९ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता म्हाडाच्या वेबसाईडवर प्रसिद्ध केली जाईल. लॉटरीची दिनांक व वेळ नंतर जाहीर केला जाणार आहे.
म्हाडाने कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार व प्रॉपर्टी एजंट म्हणून नेमलेले नाही. अर्जदाराने कोणत्याही अशा व्यक्तीशी परस्पर व्यवहार करू नये तसे केल्यास म्हाडा कोणत्याही व्यवहारास / फसवणूकीस जबाबदार राहणार नाही.