नायट्रोजन सिलिंडरच्या स्फोटाने वरळी हादरली; महिला जखमी, डोक्यासह पायाला लागला मार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2020 01:56 IST2020-09-19T01:54:46+5:302020-09-19T01:56:25+5:30
दुर्घटनेची माहिती मिळताच, मुंबई अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. दुर्घटनेत सुचित कौर नावाच्या महिलेचे पाय आणि डोक्याला मार लागला. मात्र, सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

नायट्रोजन सिलिंडरच्या स्फोटाने वरळी हादरली; महिला जखमी, डोक्यासह पायाला लागला मार
मुंबई : वरळी, सेंच्युरी बाजार येथील मनीष कमिर्शिअल सेंटरमध्ये शुक्रवारी सकाळी ८.५०च्या सुमारास २५० लीटरच्या नायट्रोजन सिलिंडरचा स्फोट झाला. या दुर्घटनेत एक महिला जखमी झाली.
दुर्घटनेची माहिती मिळताच, मुंबई अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. दुर्घटनेत सुचित कौर नावाच्या महिलेचे पाय आणि डोक्याला मार लागला. मात्र, सुदैवाने जीवितहानी झाली नाही. परिसराला बॅरिकेट्स लावून राडा-रोडा उचलण्याचे काम सुरू असतानाच या घटनेमुळे येथील वाहतूक सुरळीत करण्याचे कामही सुरू होते.
स्फोटाचा मोठा आवाज झाल्याने परिसरातील स्थानिकांनी येथे गर्दी केली होती. स्फोट एवढा भयंकर होता की, स्फोटातून बाहेर पडलेले अवशेष समोरच्या इमारतीवर जाऊन आदळले, असे स्थानिकांनी सांगितले.
वरळी येथील दुर्घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वेगाने मदत कार्य सुरू करण्यात आले. घटनास्थळावरील अग्निशमन दलाच्या जवानांना येथील कार्यवाहीबाबत योग्य सूचना आणि मार्गदर्शन व्हिडीओ कॉलद्वारे करण्यात येत होते.
- शशिकांत काळे,
प्रमुख, मुंबई अग्निशमन दल