लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : पहिली ते नववीच्या परीक्षांना आज, ८ एप्रिलपासून सुरुवात होत आहे. राज्यभरातून १ कोटी ४५ लाख विद्यार्थी या परीक्षांना बसतील. २५ एप्रिल रोजी या परीक्षा संपतील.
यंदा प्रथमच नववीला नियतकालिक मूल्यमापन चाचणी (पॅट) पद्धती लागू करण्यात आली आहे. शालेय शिक्षण विभागाने या परीक्षांचे वेळापत्रक प्रथमच राज्यस्तरावरून जारी केले. याला शिक्षक मुख्याध्यापक संघटनांनी विरोध करत स्वतंत्र वेळापत्रकदेखील शासनाला सादर केले. त्यामुळे खासगी अनुदानित शाळांनी आपल्या प्रात्यक्षिक परीक्षा ८ एप्रिल पूर्वीच सुरू झाल्या आहेत.
प्रशासनाने सर्व तयारी व्यवस्थित केली आहे. परीक्षा वेळापत्रकानुसार पार पडणार आहेत. २५ एप्रिल रोजी परीक्षा संपणार आहेत. सचिंद्र प्रताप सिंह, आयुक्त, शिक्षण विभाग