Join us  

'सर्व काही समसमान हवे', उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना अप्रत्यक्ष इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2019 8:49 PM

शिवसेनेच्या ५३ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बोलत होते.

मुंबई : भावनेने केलेली युती महत्वाची. उत्तरप्रदेशमध्येही बुआ-भतिजाची युती झाली होती. विचार नव्हता. त्यामुळे लोकसभेमध्ये दांडके उडाले आणि दुसऱ्या दिवशी युती तुटली. शिवसेनाभाजपाचे तसे नव्हते. अमित शहा चर्चेला आले. त्यांनी मुद्दे मान्य केले. मी सर्व मतभेद आधीही जाहीर सभांमधून व्यक्त केले होते. यामुळे युती सुरू राहिली, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 

शिवसेनेच्या ५३ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. विरोधी पक्ष राहिलेलाच नाही. राधाकृष्ण विखेपाटील विरोधी पक्षनेतेपदाची भुमिका बजावत होते. युती झाली आणि विखे पाटील भाजपात आले. आता पवार कंपनीला घेऊ नका. युती झाली म्हणजे मैदान साफ झाले असे समजू नका. कारण वेडेवाकडे पळत असताना पायात पाय घालून पडण्याची भीती अधिक आहे. अयोध्येत गेलो, तेव्हा मोदी पंतप्रधान झाले आता राम मंदिर उभे राहणार. मात्र, काही पत्रकारांनी 'लेकीन' प्रश्न उपस्थित केला. त्यावर त्यांना मराठीतली म्हण सांगितली. 'शुभ बोल नाऱ्या', असे म्हणत त्यांनी टोला लगावला. 

जिंकल्यानंतर आनंद झाला. पण दुसऱ्याच्या पराभवावर कधीही आनंद व्यक्त करणार नाही. जो तो त्याच्या कर्माने मरणार असतो, त्याला धर्माने मारु नकोस, असे बाळासाहेब बोललेले. मात्र, काँग्रेसच्या पराभवाचा आनंद झाला आहे. कारण त्यांनी सावरकर डरपोक होते, असे वक्तव्य केले होते. सावरकरांशिवाय सत्ता कशी मिळेल, असा प्रश्न विचारला. सावरकर नायक की खलनायक यावरही ठाकरे यांनी टीका केली. नायक की खलनायक ठेवणारा तू कोण आहेस, असा प्रश्न त्यांनी विचारला. 

हिंदू म्हटले की लोकांना पोटशूळ होतो. लोकसभेत वंदे मातरम् च्या घोषणा होतात. संसदेत नको असे हे म्हणतात. मग त्यांना ओवेसीने दिलेल्या घोषणा कशा चालतात. पाकिस्तानमध्ये जाऊन कोणी हिंदू पाकिस्तानमध्ये समान भागीदार आहोत, असे म्हणू शकतो का, असा प्रश्न ठाकरे यांनी विचारला. ईव्हीएममध्ये घोळ नाही, तर हिंदूंच्या डोक्यात असल्याचे ओवेसी सांगतो, असेही ठाकरे म्हणाले. 

मधल्या काळातील दुरावा नाहीसा झाला आहे. नवीन पीढी भाजपाकडे आणि सेनेकडे आली त्यांची स्वप्ने होती. सहाजिक होते. यामुळे दुरावा आला होता. मात्र, भाजपापेक्षा सेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपा उमेदवारांचे काम केले. मातोश्रीवर केवळ सेनेचेच खासदार आले नव्हते तर भाजपचे देखील आले होते, असे उद्धव यांनी सांगितले. 

शेवटी समारोप करताना एका लग्नाची दुसरी गोष्ट कशी असावी असे सांगताना 'सर्व काही समसमान हवे' असे म्हणज काही वेळ पॉज घेतला आणि व्यासपीठावरील बोलतोय असे म्हणत मुख्यमंत्री पदाबाबत अप्रत्यक्ष इशारा दिला. यावेळी एकच हशा पिकला.  

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनादेवेंद्र फडणवीसभाजपा