Join us  

बस अन् मर्सिडिजमधून उतरणाऱ्यांनाही मिळणार 'शिवभोजन'चा आस्वाद, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 1:44 PM

शिवभोजन थाळी कोणतेही निकष न लावता सर्वांसाठी आहे

मुंबई - ठाकरे सरकारची बहुचर्चित शिवभोजन योजनेचा शुभारंभ प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आला. राज्यातील पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यामध्ये या योजनेचा शुभारंभ केला. गोरगरिबांसाठी असलेल्या शिवभोजनची थाळीची किंमत १० रुपये असणार आहे. मात्र यासाठी काही अनेक निकष लावण्यात आला असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. त्यावर मुंबई उपगनरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी टोला लगावला आहे. 

याबाबत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, शिवभोजन थाळी कोणतेही निकष न लावता सर्वांसाठी आहे. बस आणि मर्सिडीजमधून उतरलेल्यांनाही याचा आस्वाद घेता येणार आहे. पोटाला जात, पात, धर्म आणि आर्थिक स्थितीचे निकष न लावता सर्वांना स्वस्त आणि दर्जेदार आहार मिळावा हेच या योजनेचे उद्दिष्ट आहे असं त्यांनी सांगितले. मुंबई उपनगर महसूल कर्मचारी उपहारगृह येथे नागरिकांसाठी १० रुपयांत आहार असलेल्या 'शिवभोजन' या योजनेचे उद्घाटन आदित्य ठाकरेंच्या हस्ते करण्यात आलं. 

अजिप पवार यांनी पुण्यामध्ये या योजनेचे उद्घाटन केले. यावेळी अजित पवार यांनीही शिवभोजन थाळी बाबत सूचना केली होती. या थाळीमध्ये भात, डाळ, भाजी, लोणचे, दोन चपात्या होत्या. शहरात आणि ग्रामीण भागात दर वेगवेगळे आहेत. शहरीपेक्षा ग्रामीण भागात 15 रुपये कमी ठेवण्यात आले आहेत. गरीबांना पोटभर जेवण मिळावे हा यामागचा उद्देश आहे. 150 थाळ्या देण्यात येणार आहेत. यामुळे ज्यांची पूर्ण पैसे देऊन जेवण घ्यायची ऐपत आहे अशांनी या योजनेचा लाभ घेऊ नये असं आवाहन अजित पवारांनी केलं.  

ज्यांची ऐपत आहे त्यांनी 'शिवभोजन' घेऊ नये; अजित पवारांचे आवाहन

भुकेल्याला अन्न देताना अटी घालणाऱ्या ठाकरे सरकारने गरिबांची चेष्टा सुरू केलीय. 10 रुपयात जेवणाची थाली देण्याची घोषणा केली मात्र तेथेही अटी-शर्ती ठेवण्यात आल्या आहेत. गरीबाला जेवू घालताय की त्यांची थट्टा करताय असा सवाल भाजपा आमदार राम कदम यांनी सरकारला विचारला होता. 

महत्त्वाच्या बातम्या

मला हिंदुहृदयसम्राट म्हणू नका, तो मान बाळासाहेबांचा; राज ठाकरेंची पदाधिकाऱ्यांना ताकीद

''खोलीत दोन हाणा, पण बाहेर साहेब म्हणा ही शिवसेनेची जुनी सवय''

अदनान सामीला 'पद्मश्री' देण्यावरुन वाद पेटला; मनसेपाठोपाठ काँग्रेस-राष्ट्रवादीनेही केला विरोध

CAA : किसी के बाप का हिंदुस्थान थोडी है... विरोधकांच्या शायरीला परेश रावलांचं उत्तर

बेरोजगारीच्या मुद्यावरून प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

टॅग्स :शिवभोजनालयआदित्य ठाकरे