ज्यांची ऐपत आहे त्यांनी 'शिवभोजन' घेऊ नये; अजित पवारांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2020 11:36 AM2020-01-26T11:36:02+5:302020-01-26T11:54:38+5:30

आजपासून मिळणार शिवभोजन थाळी

Shivbhojan meal Scheme started from today; Appeal of Ajit Pawar to people | ज्यांची ऐपत आहे त्यांनी 'शिवभोजन' घेऊ नये; अजित पवारांचे आवाहन

ज्यांची ऐपत आहे त्यांनी 'शिवभोजन' घेऊ नये; अजित पवारांचे आवाहन

googlenewsNext
ठळक मुद्देअजिप पवार यांनी पुण्यामध्ये आणि आदित्य ठाकरे यांनी मुंबईत या योजनेचे उद्घाटन केले.या थाळीचा स्वाद घेणाऱ्यांचा एक फोटो क्लिक केला जाणार असून मोबाइल नंबर घेऊन त्यावर ‘स्वाद चाखल्याबद्दल धन्यवाद,’ असा एसएमएसही पाठवण्यात येणार आहे. 

पुणे/मुंबई : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शिवभोजन योजनेला आजपासून सुरुवात करण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्यांची ऐपत असेल त्यांनी या योजनेचा लाभ घेऊ नये असे आवाहन केले आहे. 


अजिप पवार यांनी पुण्यामध्ये आणि आदित्य ठाकरे यांनी मुंबईत या योजनेचे उद्घाटन केले. यावेळी अजित पवार यांनी आज पहिली थाळी लाभार्थीला देण्यात आली. या थाळीमध्ये भात, डाळ, भाजी, लोणचे, दोन चपात्या होत्या. शहरात आणि ग्रामीण भागात दर वेगवेगळे आहेत. शहरीपेक्षा ग्रामीण भागात 15 रुपये कमी ठेवण्यात आले आहेत. गरीबांना पोटभर जेवण मिळावे हा यामागचा उद्देश आहे. 150 थाळ्या देण्यात येणार आहेत. यामुळे ज्यांची पूर्ण पैसे देऊन जेवण घ्यायची ऐपत आहे अशांनी या योजनेचा लाभ घेऊ नये असे आवाहन केला आहे. 


तसेच सुरवातीला योजना राबविताना काही त्रूटी असू शकतात, त्या समोर आल्यानंतर लगेचच दूर केल्या जातील, असे ही पत्रकारांना सांगितले. तसेच एल्गार पऱिषदेचा तपास केंद्राने काढून घेतल्याबाबत पवारांनी राज्याला त्यांचे काम करू द्यावे, अशी अपेक्षा असल्याचे म्हटले. 


दरम्यान पर्यावरण मंत्री आणि मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज शिवभोजन थाळीच्या योजनेचे उद्घाटन केले. मुंबई उपनगर महसूल कर्मचारी उपहारगृहात ही 10 रुपयांत थाळीची योजना सुरू करण्यात आली आहे. यावेळी त्यांनी पोटाला जात, धर्म आणि आर्थिक स्थितीचे निकष न लावता सर्वांना स्वस्त आणि दर्जेदार आहार मिळावा हेच या योजनेचे उद्दिष्ट असल्याचे म्हटले आहे. 


१० रुपयाच्या 'शिवभोजना'साठी द्यावं लागणार आधारकार्ड; ठाकरे सरकारकडून आणखी एक अट 

12 कोटींच्या महाराष्ट्रात फक्त 18 हजार नागरिकांनाच 10 रुपयांत थाळी

शिवभोजन योजनेला मंत्रिमंडळाची मान्यता, गोरगरीबांना 10 रुपयांत मिळणार जेवण

या थाळीचा स्वाद घेणाऱ्यांचा एक फोटो क्लिक केला जाणार असून मोबाइल नंबर घेऊन त्यावर ‘स्वाद चाखल्याबद्दल धन्यवाद,’ असा एसएमएसही पाठवण्यात येणार आहे. शासन निर्णयानुसार गरीब व गरजू व्यक्तींना १० रुपयांत आहार उपलब्ध करून देण्यासाठी शिवभोजन योजना प्रायोगिक तत्त्वावर राबवली जाणार आहे. त्यानुसार जिल्ह्याला एक हजार ३५० थाळ्यांचे टार्गेट आहे. योजनेत महिला किंवा महिला बचत गटांंना प्रामुख्याने हे काम दिले जाणार आहे. या केंद्रांवर वरण-भात, पोळी-भाजी, असे पदार्थ दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत उपलब्ध होणार आहे. सध्या हे केंद्र प्रायोगिक तत्त्वावर असून तेथील गर्दी पाहून तेथील थाळी कमी करायची किंवा वाढवायची, याचा निर्णय होणार आहे. एका केंद्रावर जास्तीतजास्त १५० आणि कमीतकमी ७५ थाळ्यांचे वाटप होणार आहे.

Web Title: Shivbhojan meal Scheme started from today; Appeal of Ajit Pawar to people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.