Join us  

लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतरही ६१ टक्के प्रवाशांना लोकलने एक ते दोन महिने प्रवास करायचा नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2020 7:32 PM

लोकल प्रवास लॉकडाऊननंतरही नकोच; सोशल मीडिया, अँपवर चर्चा

 

मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी म्हणून उपनगरीय लोकल ओळखली जाते. लॉकडाऊन काळात प्रवाशांसाठी लोकल सेवा बंद आहे. दररोज प्रवास करणारे प्रवासी लोकलची रोज आठवण काढत आहेत. मात्र लॉकडाउननंतरही लोकल सुरु न करण्याचे मत रेल्वे प्रवाशांचे आहे. रेल्वेचे व्हाट्सअप, फेसबुक ग्रुपवर आणि खासगी अँपवर प्रवासी आपले मत व्यक्त करत आहेत. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतरही जवळपास ६१ टक्के प्रवाशांना मुंबई लोकलने किमान एक ते दोन महिने प्रवास करायचा नाही. तर, ३९ टक्के प्रवाशांनी या प्रवासासाठी होकार दर्शवला आहे.

मागील दोन महिन्यापा सून लोकल सेवा बंद आहे. त्यामुळे रेल्वे प्रवासी वर्ग लोकल प्रवाशाच्या आठवणी काढत आहे. यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या लोकल प्रवासाच्या व्हिडीओ तयार करत आहे. यासह अनेक रेल्वेचे व्हाट्सअप, फेसबुक ग्रुपवर आणि खासगी अँपवर लॉकडाऊननंतर लोकल सुरु व्हावी कि नाही, याचे सर्व्हेक्षण करत आहेत. यामध्ये लॉकडाऊननंतर दोन ते तीन महिने लोकल सुरु होऊ नये, असे मत प्रवाशांनी व्यक्त केले. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतरही जवळपास ६१ टक्के प्रवाशांना मुंबई लोकलने किमान एक ते दोन महिने प्रवास करायचा नाही. तर, ३९ टक्के प्रवाशांनी या प्रवासासाठी होकार दर्शवला आहे. 

मुंबई लोकल प्रवाशांमधील प्रसिद्ध अशा एका खासगी अँपद्वारे घेण्यात आलेल्या सर्वेक्षणातून हे निकाल समोर आले आहेत. यासह फेसबुकवरून  प्रवाशांनी सर्व्हेक्षण केले. यामध्ये देखील लोकल प्रवास दोन-तीन महिन्यानंतर सुरु करण्याचे मत प्रवाशांनी व्यक्त केले. लॉकडाऊननंतर लोकल प्रवासासाठी प्रवाशांची मानसिकता काय आहे, हे  जाणून घेणे सर्वेक्षणाचा उद्देश होता. एका खासगी अँपद्वारे मुंबईतील जवळपास ५० हजार युजर्सचे सर्वेक्षणात करण्यात आले. या सर्वेक्षणादरम्यान युजर्सने लोकल प्रवासाबाबतचे आपले मत व्यक्त केले आहे. या सर्वेक्षणात युजर्सना लोकल प्रवास करण्यासाठी कधी आवडेल असा प्रश्न करण्यात आला होता. तर त्यासाठीचे दोन पर्यायही देण्यात आले होते. 

पहिल्या पर्यायाअंतर्गत लॉकडाऊन संपल्यानंतर लगेच प्रवास करण्याचा पर्याय होता. या पर्यायासाठी जवळपास ३९ टक्के युजर्सने आपली सहमती दर्शवली.तर दुसऱ्या पर्यायाअंतर्गत दोन ते तीन महिन्यांचा अवधी हा पर्याय देण्यात आला होता. दुसऱ्या पर्यायाअंतर्गत ६१ टक्के युजर्सने येत्या दोन ते तीन महिने प्रवास करायला नको असे मत मांडले आहे.  कोरोनाचे वाढते रुग्ण, फिजिकल डिस्टन्स या कारणामुळे प्रवासी लोकल प्रवास सुरु न करण्याचे मत सोशल मीडियावरून व्यक्त करत आहेत. 

 

टॅग्स :रेल्वेकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई