Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुतगिरण्यांना कमी दराने वीज उपलब्ध करून देण्यासंबंधी समिती स्थापन करा - मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2018 16:56 IST

वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी सुतगिरण्यांना सध्याच्या दरापेक्षा कमी दराने वीज उपलब्ध करून द्यावी, यासाठी महाउर्जा व संचालक वस्त्रोद्योग यांच्या समन्वयाने समिती स्थापन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वस्त्रोद्योग धोरणाबाबत  बैठकीत दिल्या आहेत.

मुबंई : वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी सुतगिरण्यांना सध्याच्या दरापेक्षा कमी दराने वीज उपलब्ध करून द्यावी, यासाठी महाउर्जा व संचालक वस्त्रोद्योग यांच्या समन्वयाने समिती स्थापन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वस्त्रोद्योग धोरणाबाबत  बैठकीत दिल्या आहेत. यावेळी  वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख बैठकीत उपस्थित होते. वस्त्रोद्योग विभागातर्फे सचिव वस्त्रोदयोग अतुल पाटणे यांनी यावेळी विस्तृत सादरीकरण केले.

राज्यात 132 सुतगिरण्या असून वस्त्रोदयोगाचा मुख्य घटक असलेल्या सुतगिरण्यांना कमी दराने वीज उपलब्ध करून दिल्यास त्या अधिक सक्षमपणे चालू शकतात. पारंपरिक उर्जेसोबतच सौर उर्जा व अन्य स्त्रोतांद्वारे वीज उपलब्ध्‍ा करून देण्यासंदर्भात समितीने अहवाल सादर करावा. सुतगिरण्या,साखर उद्याेग, रेशीम विकास यांना लागणाऱ्या कुशल व  तांत्रिक प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध्‍ा करून देण्यासाठी स्वतंत्र संवर्ग करण्याचे निर्देश ही त्यांनी यावेळी वस्त्रोद्योग विभागाला दिले.

कापूस उत्पादक जिल्ह्यातच वस्त्रोद्योग वाढीला प्रोत्साहन देण्यात यावे तसेच पारंपारिक धागानिर्मितीसोबतच अंबांडी, केळी, बांबू यापासून तयार होणाऱ्या धागानिर्मिती संदर्भात ही संशोधन करण्यात यावे. तसेच टेक्सटाईल युनिव्हसिर्टीबाबत देखील यावेळी चर्चा करण्यात आली. यावेळी वित्त विभागाचे अप्प्र मुख्य सचिव  डि.के.जैन, मुख्यमंत्री कार्यालयाचे अप्पर मुख्य सचिव प्रविणसिंह परदेशी,उदयोग विभागाचे अप्पर मुख्य सचिव सुनिल पोरवाल,उर्जा विभागाचे प्रधान सचिव अरविंद सिंह उपस्थित होते.

टॅग्स :देवेंद्र फडणवीसमुंबईसुभाष देशमुख