मुंबई : स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी या मेट्रो ६ मार्गिकेसाठी पश्चिम रेल्वे मार्गावर राम मंदिर आणि जोगेश्वरी रेल्वे स्थानकांच्या दरम्यान ९० टन वजनाच्या आणि ३१ मीटर लांबीच्या स्टील स्पॅनची उभारणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने केली. हे काम पूर्ण करण्यासाठी ३ तास १० मिनिटांचा ब्लॉक घेतला होता. मात्र, या स्पॅनची उभारणी अवघ्या एक तास ३५ मिनिटांमध्ये करून ‘एमएमआरडीए’ने नवी कामगिरी करत पश्चिम रेल्वेचा व्यस्त मार्ग वाहतुकीसाठी खुला केला.
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
मेट्रो ६ मार्गिकेची ८८ टक्के कामे पूर्ण झाली आहेत. आता पआव्हानात्मक मार्गावर ‘एमएमआरडीएक’डून गर्डर उभारणी करण्यात आली. यासाठी संपूर्ण मार्गावर ओव्हरहेड इक्विपमेंट बंद करणे, वायर खाली घेणे, क्रेनची उभारणी, जड स्पॅन उचलणे, अचूक बसविणे, स्ट्रक्चरल फिक्सिंग आदी कामे करण्यात आली.
मेट्रो ६ मार्गिकेची ८८ टक्के कामे पूर्ण झाली आहेत. आता ३ तासांपेक्षा अधिक कालावधीचा नियोजित ब्लॉक असताना अवघ्या एक तास ३५ मिनिटांत रेल्वे स्पॅन पूर्ण करणे हे आमच्या टीमच्या नियोजनक्षमतेचे, समन्वयाचे आणि तांत्रिक कौशल्याचे प्रतीक आहे.
डॉ. संजय मुखर्जी,
महानगर आयुक्त, एमएमआरडीए
मजबुती अन् सुरक्षितता
स्टीलच्या स्पॅनमधील संरचनेत स्टील कॉम्पोझिट गर्डर्स, डायफ्राम्स आणि ब्रेसिंग सिस्टमचा समावेश आहे. दीर्घकालीन मजबुती आणि सुरक्षितता लक्षात घेऊन त्याची रचना करण्यात आली आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
मर्यादित वेळेत आणि अचूक समन्वयाने मोहिम फत्ते
उच्च क्षमतेच्या क्रेनचा वापर स्पॅन उभारणीनंतर तपासणी करून रेल्वे मार्गिका पुन्हा सुरू करण्यात आली. हे सर्व काम मर्यादित वेळेत आणि अचूक समन्वयाने पूर्ण करण्यात आले. या कामासाठी ५०० टन आणि ६०० टन क्षमतेच्या हायड्रॉलिक क्रेन्सचा एकत्रित वापर करण्यात आला.
यातून कार्यरत रेल्वे मार्गावर स्पॅन अचूकपणे उभारणे शक्य झाले. रेल्वे मार्गावर सलग दोन स्टील स्पॅन यशस्वीरीत्या उभारल्यानंतर, मेट्रो मार्गिका ६ मधील सर्वांत महत्त्वाच्या अभियांत्रिकी आव्हानांपैकी एक टप्पा पूर्ण करण्यात ‘एमएमआरडीए’ला मोठे यश मिळाले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
Web Summary : MMRDA successfully erected a 90-ton steel span for Metro 6 on Western Railway in just 95 minutes, significantly faster than planned. This achievement on the Ram Mandir-Jogeshwari section showcases efficient planning and technical expertise, marking a major milestone for the project.
Web Summary : एमएमआरडीए ने पश्चिम रेलवे पर मेट्रो 6 के लिए सिर्फ 95 मिनट में 90 टन का स्टील स्पैन सफलतापूर्वक स्थापित किया, जो योजना से बहुत तेज है। राम मंदिर-जोगेश्वरी खंड पर यह उपलब्धि कुशल योजना और तकनीकी विशेषज्ञता को दर्शाती है, जो परियोजना के लिए एक बड़ी उपलब्धि है।