अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 07:22 IST2025-09-17T07:20:43+5:302025-09-17T07:22:08+5:30

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने दिलेल्या आकडेवारीवरून ही बाब समोर आली आहे. यंदा इंजिनिअरिंगसाठी तब्बल २,२५,१६६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

Engineering has a record 1 lakh 66 thousand admissions this year; 88 percent of seats in Computer, IT, AI filled | अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या

अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या

मुंबई : राज्यात यंदा इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाने प्रवेशाचा नवा विक्रम केला असून तब्बल १ लाख ६६ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. आतापर्यंतही हे सर्वाधिक प्रवेश आहेत. यात सर्वाधिक प्रवेश कॉम्प्युटर शाखेच्या संबंधित अभ्यासक्रमांना झाले असून काॅम्प्युटर, आयटी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स या तीन अभ्यासक्रमांच्या एकत्रित १ लाख ५ हजार जागांपैकी ९२,३७२ जागा विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. प्रवेशाचे हे प्रमाण जवळपास ८८ टक्के एवढे आहे.

मेहनत, प्रामाणिकपणा आणि राष्ट्रनिष्ठा यांची जिवंत प्रतिमा

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने दिलेल्या आकडेवारीवरून ही बाब समोर आली आहे. यंदा इंजिनिअरिंगसाठी तब्बल २,२५,१६६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यात चार कॅप फेऱ्यांमध्ये १,३०,८३५ विद्यार्थ्यांनी, तर संस्थात्मक स्तरावर २३,०४६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. तसेच व्यवस्थापन कोट्यातून १२,८६५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. यंदा राज्यात इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या २,०२,८८३ जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी १,६६,७४६ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत.

दरम्यान, सर्वाधिक प्रवेश कॉम्प्युटर, सिव्हिल, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, आयटी, एआय, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विषयात झाले असून नामांकित कॉलेजांमध्ये प्रवेशासाठी चुरस असल्याचे चित्र होते. यंदा जवळपास ८२ टक्के जागा भरल्याने कॉलेजांनाही दिलासा मिळाला आहे.

गेल्या काही वर्षांतील प्रवेश

वर्ष     जागा   प्रवेश

२०२५-२६       २,०२,८८३       १,६६,७४६

२०२४-२५       १,८०,१७०       १,४९,०७८

२०२३-२४       १,५८,५८५       १,१८,०३७

२०२२-२३       १,४३,२५५       १,०९,३४०

मुलींचे प्रमाण वाढले

यंदा मुलींच्या प्रवेशाचे प्रमाण २ टक्क्यांनी वाढले आहे. यंदा राज्यात इंजिनिअरिंग अभ्यासक्रमासाठी ६२,१९५ मुलींनी प्रवेश घेतला आहे, तर १,०४,५५० मुलांनी प्रवेश घेतला.

मुलांच्या संख्येच्या तुलनेत हे प्रमाण ३७.३० टक्के आहे. त्याचवेळी गेल्यावर्षी ५२,७५१ मुलींनी, तर ९६,३२६ मुलांनी प्रवेश घेतला होता. गेल्यावर्षी मुलींचे प्रमाण ३५.३८ टक्के होते.

शाखानिहाय उपलब्ध जागा आणि प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या

शाखा   वर्ष २०२४-२५    वर्ष २०२५-२६

शाखा   उपलब्ध जागा   प्रवेश   उपलब्ध जागा   प्रवेश

कॉम्प्युटर (सायन्स, इंजिनीअरिंग, एमएल आदी)     ५९५९४ ५४१०९ ६८०८७ ६०,२५१

अर्टिफिशियल इंटेलिजन्स १४,४४१ १२,८२५ १९,६६५ १६,९४३

आयटी १४,८२७ १३,८२३ १७,३४६ १५,१७८

मेकॅनिकल आणि सलग्न अभ्यासक्रम      २३,८१७ १६,४९३ २४६०१ १७,५६२

सिव्हिल इंजिनीअरिंग     १७,००९ १०,९३५ १७,९५६ १२,७५९

इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग १३,७५८ ९,७९३ १४,८५४ १०,७९६

इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग        २६,८४१ २३,११० ३०,०८५ २४,६६३

Web Title: Engineering has a record 1 lakh 66 thousand admissions this year; 88 percent of seats in Computer, IT, AI filled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.