‘त्या’ कर्मचाऱ्यांना मिळाले वेतन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2019 05:14 IST2019-03-09T05:14:23+5:302019-03-09T05:14:29+5:30

टाटा मूलभूत विज्ञान संस्थेतील (टीआयएफआर) शास्त्रज्ञ व कर्मचाऱ्यांचे फेब्रुवारी महिन्याचे पूर्ण वेतन जमा करण्यात आले आहे.

Employees get salary | ‘त्या’ कर्मचाऱ्यांना मिळाले वेतन

‘त्या’ कर्मचाऱ्यांना मिळाले वेतन

मुंबई : टाटा मूलभूत विज्ञान संस्थेतील (टीआयएफआर) शास्त्रज्ञ व कर्मचाऱ्यांचे फेब्रुवारी महिन्याचे पूर्ण वेतन जमा करण्यात आले आहे. मात्र यासाठी संस्थेने त्यांच्या निधीतील रक्कम खर्च केल्याची माहिती आहे.
याआधी अणुऊर्जा आयोगाने गुरुवारी ५० टक्के वेतन जमा केले होते. टीआयएफआरकडे शास्त्रज्ञ व कर्मचारी यांचे वेतन देण्यासाठी निधी नसल्याची बाब नुकतीच परिपत्रकावरून समोर आली.

Web Title: Employees get salary