प्रतिमहापालिकेत नागरी सुविधांवर भर, प्रतिमहापालिकेच्या कामकाजाकडे अन्य पक्षांनी पाठ फिरवली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 07:32 IST2025-04-27T07:31:38+5:302025-04-27T07:32:18+5:30
या प्रतिमहापालिकेच्या कामकाजाकडे अन्य पक्षांनी पाठ फिरवली. तरीही प्रतिमहापौर नेमून स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि काही माजी नगरसेवकांच्या उपस्थितीत मनसेने प्रतिमहापालिकेचे कामकाज पार पाडले.

प्रतिमहापालिकेत नागरी सुविधांवर भर, प्रतिमहापालिकेच्या कामकाजाकडे अन्य पक्षांनी पाठ फिरवली
मुंबई : मुंबई महापालिकेचा कार्यकाळ संपून दोन वर्षे होत आली तरी अजून निवडणूक झालेली नाही. त्यामुळे सगळा कारभार प्रशासक या नात्याने आयुक्त चालवत आहेत. पालिकेत लोकप्रतिनिधी नसल्याची उणीव भरून काढण्यासाठी मनसेने शनिवारी प्रतिमहापालिका भरवली. या प्रतिमहापालिकेच्या कामकाजाकडे अन्य पक्षांनी पाठ फिरवली. तरीही प्रतिमहापौर नेमून स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि काही माजी नगरसेवकांच्या उपस्थितीत मनसेने प्रतिमहापालिकेचे कामकाज पार पाडले.
या कार्यक्रमात सर्वच राजकीय पक्षांना सहभागी होण्याचे आवाहन मनसेने केले होते. आमदार आदित्य ठाकरे, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, सपचे रईस शेख, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांना निमंत्रण देण्यात आले होते. मात्र यांपैकी कोणीही उपस्थित राहिले नाही. मुंबई मराठी