अवघे जग अवाक्...! मुंबईच्या मरिन ड्राईव्हवर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष जॉगिंग करताना दिसले... (VIDEO)

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 15:33 IST2026-02-17T15:31:52+5:302026-02-17T15:33:51+5:30

Macron jogging Marine Drive :

Emmanuel Macron jogging Marine Drive Video: The 'uninhibited' who gave Rafale to India! The French President was seen jogging on Mumbai's Marine Drive; Not only Mumbaikars but the whole world was stunned... | अवघे जग अवाक्...! मुंबईच्या मरिन ड्राईव्हवर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष जॉगिंग करताना दिसले... (VIDEO)

अवघे जग अवाक्...! मुंबईच्या मरिन ड्राईव्हवर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष जॉगिंग करताना दिसले... (VIDEO)

मुंबई : राजशिष्टाचार आणि कडेकोट सुरक्षा बाजूला सारून फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आज मुंबईच्या 'मरिन ड्राईव्ह'वर जॉगिंग करताना दिसले. भारताच्या तीन दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर असलेले मॅक्रॉन सध्या मुंबईत असून, आज सकाळी त्यांनी चक्क सर्वसामान्य मुंबईकरांप्रमाणे मरिन ड्राईव्हच्या किनारपट्टीवर धावण्याचा आनंद घेतला.

सुरुवातीला मरिन ड्राईव्हवर फिरणाऱ्या नागरिकांना आपल्या शेजारून धावणारी व्यक्ती फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष आहेत, हे लक्षातच आले नाही. मात्र, काही वेळाने त्यांची ओळख पटताच तिथे उपस्थित असलेल्या लोकांमध्ये एकच खळबळ उडाली. जगातील एका शक्तिशाली देशाचे राष्ट्राध्यक्ष कोणत्याही बडेजावाशिवाय, कोणतीही असुरक्षा, धोका मनात न बाळगता  मुंबईच्या रस्त्यावर जॉगिंग करत असल्याचे पाहून अनेकजण अवाक झाले.

मुंबईकरांनी कॅमेऱ्यात कैद केला क्षण
मॅक्रॉन यांची ओळख पटल्यानंतर मॉर्निंग वॉकला आलेल्या मुंबईकरांनी त्यांना पाहण्यासाठी गर्दी केली. अनेकांनी आपल्या मोबाईल फोनवर त्यांचे व्हिडिओ रेकॉर्ड केले, तर काहींनी त्यांना अभिवादनही केले. मॅक्रॉन यांनीही मुंबईकरांच्या या उत्साहाला हसतमुखाने प्रतिसाद दिला. त्यांच्यासोबत त्यांचे सुरक्षा रक्षकही साध्या वेशात धावत होते. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष भारताच्या दौऱ्यावर असून त्यांच्या या मुंबई भेटीतील 'जॉगिंग'ची चर्चा आता सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरत आहे.

Web Title : मैक्रॉन ने मुंबई को चौंकाया: फ्रांसीसी राष्ट्रपति मरीन ड्राइव पर जॉगिंग करते दिखे

Web Summary : भारत की आधिकारिक यात्रा पर आए फ्रांसीसी राष्ट्रपति मैक्रॉन ने मरीन ड्राइव पर जॉगिंग करके मुंबईवासियों को आश्चर्यचकित कर दिया। भारी सुरक्षा के बिना उन्हें लापरवाही से व्यायाम करते देख स्थानीय लोग चकित थे। कई लोगों ने इस पल को अपने फोन में कैद कर लिया, जिससे सोशल मीडिया पर चर्चा शुरू हो गई।

Web Title : Macron Stuns Mumbai: French President Spotted Jogging on Marine Drive

Web Summary : French President Macron, on an official visit to India, surprised Mumbaikars by jogging on Marine Drive. Locals were amazed to see him without heavy security, casually exercising. Many captured the moment on their phones, creating a social media buzz.