मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 23:27 IST2025-09-11T23:24:05+5:302025-09-11T23:27:02+5:30
Elphinstone Bridge: एल्फिन्स्टन ब्रिज पाडून नवीन उड्डाणपुलाची उभारणी करण्यात येणार आहे.

मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
Elphinstone Bridge: प्रभादेवी येथील एल्फिन्स्टल पूल पाडकामाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. परेल व प्रभादेवी परिसरास पूर्व-पश्चिमेस जोडणारा एल्फिन्स्टन ब्रिज हा मुंबई महानगर विकास प्राधिकरण विभागामार्फत तोडून नवीन एल्फिन्स्टन उड्डाणपुल व शिवडी-वरळी एलिव्हेटेड कनेक्टर उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. त्यामुळेच एल्फिन्स्टन ब्रिज मार्गे जाणारी वाहतूक सुरक्षिततेसाठी तात्पुरती बंद करण्यात आली असून, इतर मार्गाने पळवण्यात आली आहे.
त्यामुळेच वाहतूक व्यवस्थापनाबाबत खालीलप्रमाणे आदेश शुक्रवार दिनांक 12/09/2024 रोजी 23.59 वा.पासून अमलात राहतील.
पूर्वेकडून पश्चिमेकडे (East → West):
दादर ईस्ट → दादर वेस्ट : तिळक ब्रिज
परळ ईस्ट → प्रभादेवी / लोअर परळ : करिअ रोड ब्रिज (07.00 – 15.00)
परळ / भायखळा ईस्ट → प्रभादेवी / वरळी / सी लिंक : चिंचपोकळी ब्रिज
पश्चिमेकडून पूर्वेकडे (West → East):
दादर वेस्ट → दादर ईस्ट : तिळक ब्रिज
प्रभादेवी / लोअर परळ → परळ / KEM / टाटा हॉस्पिटल : करिअ रोड ब्रिज (15.00 – 23.00)
सी लिंक / वरळी / प्रभादेवी → परळ / भायखळा ईस्ट : चिंचपोकळी ब्रिज
करिअ रोड (महादेव पालव रोड) वाहतूक वेळापत्रक
07.00 – 15.00 : भारत माता जंक्शन → शिंगटे मास्टर चौक (एकमार्गी)
15.00 – 23.00 : शिंगटे मास्टर चौक → भारत माता जंक्शन (एकमार्गी)
23.00 – 07.00 : दोन्ही बाजू खुली
नो पार्किंग रस्ते
एन. एम. जोशी रोड
सेनापती बापट रोड
महादेव पालव रोड
साने गुरुजी रोड
भवानी शंकर रोड
रावबहादुर एस.के. बोले रोड
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग (पूर्ण)