मुंबई : परळ आणि प्रभादेवी परिसरास जोडणारा प्रभादेवी स्थानकावरील पूल बंद केल्याचा फटका एसटीच्या प्रवाशांना बसणार आहे. पूल बंद केल्यामुळे परळ आगारातून सुटणाऱ्या एसटीच्या मार्गात बदल करण्यात येणार आहे. परिणामी, या बसच्या तिकिटात १० रुपयांची वाढ केली जाणार आहे.
असा घालावा लागेल एसटीला वळसा
प्रभादेवी स्थानकावरील पूल साधारण २ वर्षांसाठी बंद असणार आहे. त्यामुळे परळ आगारात दादर येथून येणाऱ्या बस मडके बुवा चौक (परळ टी.टी. जंक्शन), डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडने- भारतमाता जंक्शन-संत जगनाडे चौक येथून उजवे वळण घेऊन साने गुरुजी मार्गाने चिंचपोकळी ब्रिजवरून एन.एम. जोशी मार्गाने आगारात येतील व त्याच मार्गाने परत मार्गस्थ होणार आहेत.
ई शिवनेरी व शिवनेरी बसकरिता दादर ते परळ जाताना दादर टी.टी. सर्कल, टिळक ब्रिज- कबुतर खाना उजवे वळण घेऊन भवानी शंकर रोड, शारदाश्रम, गोपिनाथ चव्हाण चौक मार्गे परळ बस स्थानकात जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
...तर आंदोलन करणार
१० दिवसांत याबाबत निर्णय घेऊ असे सत्ताधारी पक्षाने सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे आश्वासन दिले आहे. निर्णय न घेतल्यास रणनीती ठरवू, असे उद्धवसेनेचे नेते उल्हास पांचाळ यांनी सांगितले.