Elgar Parishad case: Delhi professor remanded in judicial custody till August 21 | एल्गार परिषद प्रकरण : दिल्ली प्राध्यापकला २१ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी

एल्गार परिषद प्रकरण : दिल्ली प्राध्यापकला २१ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी

मुंबई : एल्गार परिषद प्रकरणी अटकेत असलेले दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक हनी बाबू यांना विशेष न्यायालयाने शुक्रवारी २१ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. 

हनी बाबू यांची एनआयए कोठडी शुक्रवारी संपल्यावर विशेष न्यायालयाचे न्या. डी. ई. कोथळीकर यांनी त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.

आरोपीचा माओवाद्यांशी संबंध आहे, असा आरोप तपासयंत्रणेने केला आहे.  हनी बाबू आणि अटकेत असलेल्या अन्य आरोपींनी माओवाद्यांसाठी निधी जमा केला. उर्वरित तपास सुरू आहे.  आतापर्यंत झालेल्या तपसावरून  हे निष्पन्न झाले की, समाजातील काही गटांत वैर निर्माण करण्याचा कट हनी बाबू यांनी रचला. त्यामुळे दंगल उसळली, काहींचा मृत्यू झाला आणि राज्यभर निदर्शने करण्यात आली, असे एनआयच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले.

एनआयएचे म्हणणे ऐकल्यावर न्यायालयाने हनी बाबू यांच्या एनआयए कोठडीत आणखी तीन दिवस वाढ केली. 

३१ डिसेंबर २०१७ रोजी पुणे येथे कबीर कला मंचाने आयोजित केलेल्या एल्गार परिषदेत चिथावणीखोर भाषणे करण्यात आली. परिणामी दुसऱ्या दिवशी कोरेगाव भीमा येथे जातीय दंगल उसळली.

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Elgar Parishad case: Delhi professor remanded in judicial custody till August 21

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.